काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले Pudhari
नांदेड

Nanded Congress Protest | हिमायतनगर तालुका दुष्काळ जाहीर करा; काँग्रेसचे घंटानाद आंदोलन

शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; तहसीलदारांना निवेदन

पुढारी वृत्तसेवा

Himayatnagar Drought Declaration Demand

हिमायतनगर : हिमायतनगर तालुक्यात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील पिकांवर मोठा परिणाम झाला असून अनेक भागांत पिके करपून गेल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देऊन हिमायतनगर तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली.

माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात आले.

तालुक्यात पावसाअभावी सोयाबीन, कापूस, हळद, तूर यासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मागील काही काळापासून नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदाच्या पावसाच्या खंडामुळे आणखी आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे शासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, कर्जमाफीच्या यादीतून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची नावे तातडीने जाहीर करून त्यांनाही कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

यावेळी हिमायतनगर तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT