मुखेड : सतत वाढत्या उन्हामुळे उष्णता वाढली असताना सातत्याने नागरीकांनी घराबाहेर पडु नये अशा सुचना दिल्या जात आहेत. त्यामुळे उष्माघाताची शक्यता लक्षात घेता, आ. डाॅ. तुषार राठोड यांनी जिल्हा शल्यचिकीत्सक डाॅ.पेरके याचेशी संपर्क साधुन मुखेड उपजिल्हा रुग्नालयात उष्माघात कक्षाची स्थापना करणेची सुचना केली होती.
त्याची दखल घेत मुखेड उपजिल्हा रुग्नालयात हा कक्ष सुरु करण्याचे आदेश दिले. त्याच्या आदेशानुसार उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहीती वैद्यकीय अधिक्षक बालाजी आदमपुरकर यांनी दिली. दुपारी 11 ते4 या वेळेत उन्हात बाहेर फिरु नका, उष्माघाताचा त्रास झाल्यास (उलटी, मळमळ, चक्कर येणे अशक्तपणा जाणवणे, बेशुध्द होणे) अशी लक्षणे असल्यास ताबडतोब उपजिल्हा रुग्नालयात दाखल होऊन उपचार करुन घ्यावेत. तसेच खाजगी वैद्यकीय व्यवसायिकाकडे उष्माघाताचे रुग्न असल्यास गरजु रुग्नांना उपजिल्हा रुग्नालयात पाठवण्याची विनंती ही केली आहे.