Death News  Pudhari
नांदेड

Nanded farmer death|कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने गळफास घेऊन आयुष्य संपवले, हंगिरगामधील घटना

Nanded farmer hanging death - परिसरातून हळहळ

पुढारी वृत्तसेवा

उमरी - कर्जबाजारीपणाला कंटाळून हंगिरगा (ता. उमरी) येथील शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन स्वत: आयुष्य संपवल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. राजू दिगांबर वहिंदे (वय ४०, रा. हंगिरगा, ता. उमरी, जि. नांदेड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजू वहिंदे नापिकीमुळे ते गेल्या काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होते. या कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे.

मंगळवारी सकाळी वडीलांच्या शेतशिवारात ही घटना निदर्शनास आल्यानंतर कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गेल्या दोन तीन दिवसापूर्वी गळफास घेतली असावी, असे बाबुराव वहिंदे यांनी सांगितले. मृत्यूचे कारण मात्र, अद्याप समजले नाही. वहिंदे यांच्या मृतदेहावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT