Nanded gambling raid pudhari photo
नांदेड

Nanded gambling raid : जुगार अड्ड्यावर छापा; ५ जण गजाआड, ३ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : जिह्यातील जुगार, मटका आणि इतर अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेंतर्गत कुंटूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुजलेगाव शेतशिवारात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत एकूण ३,१३,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

​गुप्त बातमीदाराकडून सुजलेगाव परिसरात काही इसम पैशांवर 'तिर्रट' नावाचा जुगार खेळत असल्याची पक्की माहिती कुंटूर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक भोसले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पंचांसमक्ष सापळा रचून धाड टाकली.

​कारवाईदरम्यान रवीराज उत्तम जुकरें (वय २७, रा. सुगाव), सुनील माधवराव उच्चे (वय २५, रा. करे मलक्कापूर), साईराज रामकिशन कदम (वय २९), अभिषेक योगेश्वर हरगे (वय २७) आणि लक्ष्मण किशनराव तरकेटे (वय ३३, तिघेही रा. सुजलेगाव) या पाच जणांना जुगार खेळताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले.

संशयितांकडून २१,७०० रुपयांची रोख रक्कम, २ लाख २० हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकली व एक बुलेट, ७२ हजारांचे ४ मोबाईल फोन आणि जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागरिकांनी परिसरात अवैध धंदे सुरू असल्यास तात्काळ पोलीस ठाणे किंवा 'डायल ११२' वर माहिती द्यावी; माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन नांदेड पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT