Land Seeding Issu Pudhari
नांदेड

PM Kisan Beneficiaries : नो लँड सिडिंगच्या समस्येमुळे असंख्य शेतकरी 'पीएम किसान' योजनेपासून वंचित

PM Kisan Beneficiaries: कृषी आणि महसूल विभागाच्या किचकट प्रक्रियेत शेतकरी अडचणीत

पुढारी वृत्तसेवा

मुखेड : मागील दोन ते तीन महिन्यांपासून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवर लॉगिन होत नसल्याने आणि ॲप बंद असल्यामुळे मुखेड तालुक्यातील सुमारे ७ ते ८ हजार शेतकरी केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. शेतकऱ्यांची ही प्रलंबित समस्या तात्काळ सोडवून 'नो लँड सिडिंग'चे पोर्टल लवकर सुरू करावे; अशी मागणी जिल्हाधिकारी याच्यांकडे तहसीलदार मार्फत शेतकरी नेते शिवशंकर पाटील कलबंरकर आणि ग्राहक पंचायत संघटनेचे तालुका उपाध्यक्ष महेताब शेख यांनी एक निवेदन देवुन ही मागणी केली आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेवू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांची शेती 'नो लँड सिडिंग'मध्ये आहे कींवा नाही, हे जोपर्यंत तहसील कार्यालयाकडून प्रमाणित करून दिले जात नाहीत. तोपर्यंत शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ देता येणार नाही असे तालुका कृषी कार्यालयाकडून सांगितल्या जात आहे. मात्र,पोर्टल बंद असल्याने ही प्रक्रिया रखडली असून हजारो शेतकरी या योजनेच्या लाभापासुन वंचित राहीले आहेत.

तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या नावे २०१९ नंतर फेरफार होऊन शेतीची नोंद झाली आहे. किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या निधनानंतर वारसा हक्काने जमीन नावावर झाली आहे, असे शेतकरी या योजनेच्या लाभासाठी सर्वाधिक प्रयत्नशील आहेत. हे शेतकरी आवश्यक कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकारी कार्यालय गाठत आहेत. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे सर्व कागदपत्र त्याठिकाणी तपासणी झाल्यानंतर त्यांना पुन्हा तहसीलच्या 'नो लँड सिडिंग' प्रमाणपत्रासाठी पाठवले जात आहे. तहसिलमध्ये संबंधित विभागाकडे याकामी शेतकरी गेल्यानंतर तिथे लँड सिंडीगचे पोर्टल बंद असल्याचे सांगितल्या जात आहे. शासनाच्या या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असून, प्रशासनाने यात तातडीने लक्ष घालून पोर्टलची तांत्रिक अडचण दूर करावी व शेतकऱ्यांना न्याय द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT