खूनाच्‍या घटनेनंतर घटनास्‍थळाची पोलिस अधिकाऱ्यांनी पहाणी केली. pudhari photo
नांदेड

Nanded Crime : दुहेरी खुनांच्या घटनेने नांदेड हादरले; २४ तासांत दोन तरुणांची हत्या

बाफना, सिडको परिसरात थरार : टोळीयुद्धासह अज्ञाताकडून हत्या : आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : नांदेड शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली असून शनिवारी (दि.८) दुहेरी खूनाच्‍या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. २४ तासांत शहरातील बाफना परिसरात एका अज्ञाताचा डोक्यात दगड घालून, तर सिडको परिसरात पूर्ववैमनस्यातून (टोळी युद्ध) एका तरुणाची धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण हत्‍या करण्यात आली. एकापाठोपाठ घडलेल्या या धक्कादायक घटनांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसले आहे.​

मिळालेल्या माहितीनुसार, बाफना परिसरातील एका ऑटोमोबाईल्स दुकानासमोर ३० ते ३५ वयोगटातील एका तरुणाचा मृतदेह शनिवारी (दि. ८) सकाळी आढळून आला. अज्ञात हल्खोरांनी त्याच्या डोक्यात दगड घालून अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याचे उघडकीस आले. मृत तरुणाची अद्याप ओळख पटलेली नसून पोलिस त्याची माहिती मिळवत आहेत.

दरम्यान, ही घटना ताजी असतानाच दुसऱ्या घटनेत शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास सिडको परिसरातील दुग्ध डेअरी जवळील पेट्रोल पंपासमोर टोळीयुद्ध (गँगवॉर) भडकले. यात बलजितसिंग बावरी (२४, रा. कौठा) या तरुणावर चार ते पाच जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्रांनी भीषण हल्ला चढवत सपासप वार केले. या प्राणघातक हल्ल्यात इंदरसिंग बावरी याचा जागीच मृत्यू झाला. दरम्‍यान शहर व परिसरात वाढत्या गुन्हेगारीमुळे प्रचंड दहशत पसरली आहे. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

​पोलिस अधीक्षकांकडून घटनास्थळाची पाहणी

​घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. घटनास्थळावरून फॉरेन्सिक टीम, ठसेतज्ज्ञ, श्वानपथक आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तांत्रिक तपास वेगाने सुरू आहे.

नातेवाईकांचा मृतदेह स्वीकारण्यास नकार

​दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. मात्र, सिडकोतील गँगवॉरमध्ये मारल्या गेलेल्या इंदरसिंग बावरी याच्या नातेवाईकांनी आरोपींचा तात्काळ 'एनकाउंटर' करण्याची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT