नांदेड : भाजपाचे मुख्यमंत्री शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष ही त्यांची प्रतिमा. नांदेड जिल्ह्यात त्यांच्या पक्षाचे खासदार दोन आणि आमदार तर तब्बल पाच; पण नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतल्या प्रस्तावित नोकरभरतीच्या विषयात जिल्ह्यात एकमेव असलेले 'राष्ट्रवादी'चे आमदार प्रताप गोविंदराव पाटील चिखलीकर हे भाजपाच्या 'सप्तका'वर भारी ठरत चालले आहेत.
जिल्हा बँकेतील नोकरभरतीचा विषय गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हाभर गाजत असून त्यात बँकेचे अध्यक्ष वगळता समस्त संचालक मंडळावर संशयकल्लोळ निर्माण झाला असला, तरी आजवर कोणीही खुलासा केला नाही. प्रस्तावित भरती होणारच, असे आ.प्र.गो. चिखलीकर यांनी सोमवारी पत्रकारांसमोर निक्षून सांगितल्यानंतर निर्वावलेपणानंतर त्यांचे 'भारीपण' उजागर झाले.
कर्मचारी भरतीमध्ये संचालकांचा 'कोटा' नक्की झाल्याचे गेल्या महिनाभरात बँकेच्या मुख्यालयातील घडामोडींतून स्पष्ट झाले होते. त्यानंतर भाजपाचे आमदार राजेश पवार यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना त्वरेने पत्र पाठवून बँकेतील नोकरभरती प्रक्रिया आहे त्या बँकेतील नोकरभरती प्रक्रिया आहे त् टप्प्यावर थांबवा, अशी मागणी केली. तत्पूर्वी आ. पवार यांनी २५ सप्टेंबर रोजीही मुख्यमंत्री कार्यालयास सविस्तर पत्र सादर करून बँकेतील नोकरभर थांबविण्याची विनंती केली होती.
भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी गेल्या महिन्यातच मुख्यमंत्री कार्याल्यास वरील विषयात अवगत केले होते. त्यानंतर वरील कार्यालयाने बँकेतील हे प्रकरण अत्यंत गंभीरपणे घेतले असून तातडीने हस्तक्षेपात्मक कारवाई होईल, असे सांगितले जात असताना, गणेशोत्सवादरम्यान मुंबईमध्ये गेलेले चिखलीकर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यातील गणरायाची आरती करतानाची छायाचित्रे प्रसृत झाली. 'बँकेतील भरती आमच्या इच्छेप्रमाणे होऊ' देण्याचे साकडेच त्यांनी गणरायास घातले असावे, असेच तेव्हा संबंधितांना वाटले.
आ. चिखलीकर यांचे प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे 'राष्ट्रवादी'चे असेलले सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी बँकेतील प्रस्तावित नोकरभरतीतील ५० टक्के जागा भरण्यास मंजुरी दिली होती. या कामाचे तेव्हा कौतुकच झाले. पण भरती प्रक्रियेतील काही बाबी पूर्ण केल्या जात असताना १५६ जागांमधील सर्वाधिक वाटेकरी कोण, हे समोर आल्यानंतर मंजुरीसाठी केलेल्या प्रयत्नांतील खरा इरादा उघड झाला.
भाजपाच्या लोकप्रतिनिधींपैकी एकही जण बँकेच्या संचालक मंडळात नाही. दुसऱ्या बाजूला भाजपाविरोधी दोन खासदार मात्र संचालक मंडळात असून चिखलीकर यांनी त्यांनाही आपल्या 'प्रतापी मोहिमे'त सामील करून घेतले आहे. एका माजी आमदारासाठी भरतीचा विषय 'जीव की प्राण' असा झाला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यातील बँक संचालक मंडळाच्या बैठकीनंतर असल्याचे दिसत आहे. नोकरभरतीच्या विषयाने उचल खाल्ली
जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्यांना कोल्हापूरच्या धर्तीवर मदत द्या, ही मागणी सर्वप्रथम केली होती, काँग्रेसच्या संदीपकुमार देशमुख यांनी. नंतर भाजपा आमदारांनी हीच मागणी रेटल्यानंतर आ. चिखलीकर यांनी सोमवारी स्थानिक वार्ताहरांशी अतिवृष्टी, जिल्ह्यातील स्थिती या विषयांवर संवाद साधत ऊस दरावरून खा. अशोक चव्हाण यांना टोला लगावला. याच संवादादरम्यान त्यांनी बँकेमधील भरती होणार, असे ठामपणे सांगितले. त्यानंतर तशा हालचाली सुरू झाल्याचे समोर आले आहे.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असो, की अन्य कोणतीही संस्था. नोकरभरतीच्या प्रक्रियेत संचालकांची लुडबुड आणि हस्तक्षेप होऊ नये, अशी आपली भूमिका आहे. नांदेड बँकेत भरतीपूर्वीच गोंधळ दिसत असून मी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणारही आहे. आ. राजेश पवार