Nanded Crime News : १५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; नराधमास २० वर्षे सश्रम कारावास Pudhari FIle Photo
नांदेड

Nanded Crime News : १५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; नराधमास २० वर्षे सश्रम कारावास

बिलोली अतिरिक्त जिल्हा न्यायालयाचा निकाल

पुढारी वृत्तसेवा

Nanded Crime News: 15-year-old girl raped; Man gets 20 years rigorous imprisonment

बिलोली, पुढारी वृत्तसेवा लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला बिलोली न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. आरोपी रामदास मोतीराम काचेबाईनवाड (३२, रा. कासराळी, ता. बिलोली) याला २० वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली असून, दंड न भरल्यास अतिरिक्त ३ वर्षे सश्रम कारावासाची तरतूदही न्यायालयाने केली आहे.

९ ऑक्टोबर २०२३ रोजी पहाटे ३:०० वाजेच्या सुमारास आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या पालकांच्या ताब्यातून पळवून नेले होते. त्यानंतर तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी बिलोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार आर ोपीवर रामदास मोतीराम काचेबाईनवाड पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा सखोल तपास करून महिला पोलिस उपनिरीक्षक बळेगावे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी अभियोक्त्यांचा प्रबळ युक्तिवाद आणि भक्कम पुराव्यांच्या आधारे, जिल्हा सत्र न्यायाधीश-१ तथा अति. सत्र न्यायाधीश वि. ब. बोहरा यांनी आरोपीला दोषी ठरवून २० वर्षे सश्रम कारावास दहा हजार रुपये आर्थिक दंड न भरल्यास अतिरिक्त ३ वर्षे सश्रम कारावास याप्रमाणे शिक्षा सुनावली आहे.

या प्रकरणात सरकारच्या वतीने सहायक सरकारी अभियोक्ता संदीप भीमराव कुंडलवाडीकर व अॅड. जयेश संदीप अग्रवाल यांनी काम पाहिले. या निकालामुळे समाजात वावरणाऱ्या अशा विकृत प्रवृत्तींना मोठा जरब बसला असून, पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT