मुखेड : अल्पवयीन पिडीता एकटीच घरी असताना, पावसाचे थेंब येत असल्याने अरोपीने शेजारी राहणा-या पिडीतेस घरात कपडे वाळु घालण्यास सांगितले. ती घरात गेली असताआरोपीने दरवाजा बंद करुन तोंडात बोळा कोंबुन लैंगिक अत्याचार केले होते. पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी बाबुराव ग्यानोबा जाधव (वय : 72 वर्ष) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपीविरूद्ध मुक्रमाबाद पो.स्टे. येथे गुरन 171/2024 भारतीय दंड न्यायसंहीता व कलम 4, 6 बालकाचे लैंगिक आत्याचारा पासुन संरक्षण कायदा 2012 अन्वये हा गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण मुखेड न्यायालयात चालले असता 9 साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात साक्षीदाराची साक्ष,वैद्यकीय अहवाल, वैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवाल व विशेष सरकारी वकील यांनी केलेला युक्तीवाद, ग्राह्य धरुन पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायधिश एस.पी. देशमुख यांनी 14 ऑगस्ट 2026 रोजी आरोपीस दोषी ठरवले.
दरम्यान सुनावणावेळी कलम 4 पोक्सो अँक्ट अन्वये आजन्म कारावासाची शिक्षा व 10,000 दंड तसेच 6 पोक्सो अँक्ट अन्वये आजन्म कारावासाची शिक्षा व 10,000 हजार रु. दंड लावला दंड न भरल्यास पुन्हा एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी अभिवक्ता गाजानन भिकाजी खिल्लारे यांनी काम पाहीले.