Nanded Crime 
नांदेड

Nanded Crime | क्षुल्लक वाद थेट डोक्यात घातली वीट, एकाचा मृत्‍यू

शेख नयूम बागवानचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्‍यू

पुढारी वृत्तसेवा

हदगाव : हदगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हदगाव शहरातील आझाद चौक,बागवान गल्ली परिसरात मध्यरात्री घरासमोर जोरजोरात बोलण्यावरून सुरू झालेला क्षुल्लक वाद थेट प्राणघातक ठरला. आरोपींनी केलेल्या विटेच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

(दि.२८) जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे १२.१५ वाजता आरोपी फिर्यादी यांच्या घरासमोर थांबून मोठ्याने बोलत होते. यावरून फिर्यादीने जाब विचारताच वाद वाढला. या वादातून आरोपींनी शेख नयूम शेख इस्माईल बागवान (वय ४६ रा. बागवान गल्ली,आझाद चौक) यांच्या डोक्यावर विटेने जोरदार प्रहार केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेख नयूम यांना तातडीने उपचारासाठी विष्णुपुरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मात्र उपचारादरम्यान दिनांक २९ जानेवारी २०२६ रोजी त्यांचा मृत्यू झाला.मृत्यूची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ केली आहे.या प्रकरणी सुलताना बी शेख नईम शेख बागवान यांच्या फिर्यादीवरून हदगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. २३/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर प्रकरणातील आरोपी शेख आसिफ शेख युसुफ, शेख शोयब शेख युसुफ, शेख आतिक शेख युसुफ, शेख हसन शेख कश्मीरी व शेख युसुफ शेख कश्मिरी (सर्व रा. बागवान गल्ली, आझाद चौक) यांना ताब्यात घेणार आहोत अशी माहीती मिळाली असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले आहे..

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT