नांदेड

नांदेड : २० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी लिपिकाला अटक

अविनाश सुतार

नांदेड, पुढारी वृत्तसेवा: सेवानिवृत्त औषध निर्मात्याचे गटविमा योजनेचे बिल काढल्यानंतर बक्षीस म्हणून २० हजारांच्या लाचेची मागणी केली. याप्रकरणी विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैदयकीय महाविद्यालय व रूग्णालय कर्मचारी सहकारी पतसंस्थेतील वरिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (दि. २७) अटक केली. गुलाब श्रीधरराव मोरे असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

नांदेडच्या विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रूग्णालय येथील प्रशासकीय अधिकारी बालाजी बोधगिरे यांनी व वरिष्ठ लिपिक गुलाब मोरे यांनी सेवानिवृत्त औषध निर्माता यांचे गट विमा योजनेचे बिल काढतो, परंतू यापूर्वी रजा रोखीकरणाचे काढलेल्या बिलाचे बक्षीस म्हणून २० हजार रूपये द्यावे लागतील. नाही तर गट विमा योजनेचे बिल लवकर टाकणार नाही, असे सांगितले. त्यामुळे तक्रारदार यांनी २० हजार देण्यास होकार दिला.

दरम्यान, तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधकाकडे तक्रार दिली. २ मार्चरोजी पडताळणीत वरील दोघांनी पंचासमक्ष २० हजार रूपयांची मागणी केल्याची निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने २७ मार्चरोजी तक्रारदारास वरिष्ठ लिपिक गुलाब मोरे याच्याकडे पंचासह लाच स्विकृतीसाठी पाठविले असता त्यांना संशय आल्याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. संशयित आरोपी वरिष्ठ लिपिक गुलाब श्रीधरराव मोरे यास पथकाने ताब्यात घेतले आहे. नांदेड ग्रामीण ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT