नांदेड बाजार समितीने मांडला अनधिकृत गाळ्यांचा बाजार pudhari photo
नांदेड

Nanded APMC Scam : नांदेड बाजार समितीने मांडला अनधिकृत गाळ्यांचा बाजार

सभापती, सचिव, संचालकांना कोर्टाच्या नोटीस

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीने अनाधिकृतरित्या तब्बल २४ गाळे बांधून ती विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी काँग्रेसचे कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण यांनी न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत बाजार समितीचे सभापती, सचिव आणि संचालकांना नोटिसा बजावल्या आहेत.

२००१ मध्ये तत्कालीन पालकमंत्र्यांनी सहकार खात्याला मोठी जागा देण्यासाठी भूमिपुजन केले होते. परंतु सहकार खात्याला सदरील जागा न देता सभापती, सचिव व इतर पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी २४ दुकाने उभारली. ही दुकाने बड्या व्यापाऱ्यांना विक्री देखील करण्यात आली. एवढेच नव्हे तर त्या जागेवरील ओपन स्पेस देखील विक्री केली असल्याचाची धक्कादायक माहिती आहे.

सहकार खात्याच्या डोळ्यात धुळफेक होत असतांना शासकीय कार्यालय गप्प का राहिले? असा सवाल बालाजी चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस स्थानकात रितसर तक्रार दाखल करण्यात आली. परंतु त्याची दखलही घेतली नाही. त्यामुळे जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे यासाठी न्याय मागण्याचा प्रयत्न करण्यात आला.

तेथेही न्याय न मिळाल्याने बालाजी चव्हाण यांनी अखेर न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या सर्व बाबीची गंभीर दखल घेतली असून संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. न्यायालयात या प्रकरणी पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT