Nagzhari reservoir loses capacity due to silt accumulation 
नांदेड

Nanded | गाळाने घटली नागझरी जलाशयाची क्षमता; पाण्याचा अपव्यय सुरूच !

Nagzhari reservoir loses capacity due to silt accumulation- किनवट : गाळमुक्ती, दुरुस्ती व कालव्यांच्या काँक्रिटीकरणाची मागणी

पुढारी वृत्तसेवा

किनवट : शहराच्या पाणीपुरवठ्यासह पुरवठ्यासह परिसरातील शेतीच्या सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या नागझरी मध्यम प्रकल्पातील जलसाठ्याची क्षमता गाळ साचल्याने वर्षागणिक घटत असताना, दुसरीकडे सांडव्यातील भगदाडांतून पाण्याचा सतत विसर्ग होत असल्याची स्थिती आहे. जलाशयाच्या भिंतीवरील झाडाझुडपांच्या मुळांमुळे बांधकामाला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत असून, या प्रकल्पाची तातडीने दुरुस्ती, गाळमुक्ती आणि कालव्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

१९७२ च्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नागझरी जलाशयाची उभारणी करण्यात आली. साधारणतः १९८३ मध्ये प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर परिसरातील शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊ लागले. मात्र, गेल्या चार दशकांहून अधिक काळात जलाशयातील गाळ काढण्याचे काम झाले नसल्याने पावसाळ्यात वाहून येणारा गाळ साठत गेला. परिणामी, मूळ जलसाठवण क्षमतेवर परिणाम होऊन सिंचनासाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे प्रमाणही कमी होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.

त्यातच जलाशयाच्या आतील भिंतीवर आणि सांडव्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढली आहेत. त्यांच्या मुळांमुळे बांधकामाच्या ठिकाणी पोकळ्या व भगदाडे निर्माण झाल्याचे दिसत असून, त्यातून पाणी बाहेर पडत आहे.

सध्या सुरू असलेला हा विसर्ग केवळ पाण्याचा अपव्यय करणारा नसून, भगदाडांचा आकार वाढल्यास विशेष म्हणजे, किनवट शहराच्या सुमारे २८ हजार लोकसंख्येच्या पाणीपुरवठ्याची भिस्तही याच जलाशयावर आहे. शहराचा विस्तार आणि लोकसंख्येतील वाढ लक्षात घेता भविष्यातील पाण्याची गरज भागविण्यासाठी उपलब्ध जलसाठ्याचे योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे. त्यामुळे नागझरी जलाशयाच्या सद्यस्थितीची तांत्रिक तपासणी करून गाळमुक्ती, सांडव्याची दुरुस्ती, जलसाठवण क्षमता वाढविणे आणि कालव्यांचे काँक्रिटीकरण यासाठी जलसंपदा विभागाने कालबद्ध कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

जलाशयाच्या संरचनेच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित यंत्रणेने तातडीने तांत्रिक पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जलाशयातील पाण्याच्या अपव्ययाबरोबरच सिंचनासाठीच्या कालव्यांची अवस्थाही चिंताजनक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कालव्यांमध्ये गाळ साचल्याने पाणीवहन क्षमतेवर मर्यादा येत आहेत. शिवाय कच्च्या कालव्यांतून पाणी जमिनीत मुरत असल्याने शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचण्यात अडचणी येतात.

त्यामुळे कालव्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण केल्यास पाण्याची गळती रोखण्यासह सिंचन क्षेत्र वाढविण्यास मदत होऊ शकते. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून नागझरी जलाशयातील गाळ काढण्याची कामे हाती घेणे शक्य आहे. त्यातून स्थानिक मजुरांना रोजगार मिळण्याबरोबरच जलसाठवण क्षमता वाढविण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. जलाशयाची आणि सांडव्याची उंची वाढविण्याच्या मागणीचाही तांत्रिक व व्यवहार्यतेच्या दृष्टीने विचार करण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT