Nanded Crime : गडगा शिवारात दसऱ्याच्या दिवशीच खून Pudhari File Photo
नांदेड

Nanded Crime : गडगा शिवारात दसऱ्याच्या दिवशीच खून

१७ वर्षीय जिशानचा मृतदेह जाळलेल्या अवस्थेत आढळला

पुढारी वृत्तसेवा

Murder on the day of Dussehra in Gadga Shivara

नायगाव, पुढारी वृत्तसेवा डोंगरगाव (ता. मुखेड) येथील जिशान लतीफ सय्यद (वय १७) या बारावीतील विद्यार्थ्यांचा खून करून त्याचा मृतदेह जाळून ओळख नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना ऐन दसऱ्याच्या दिवशी गडगा शिवारात म्हणजे गुरुवारी (दि.२) उघडकीस आली आहे,

जिशान हा १ ऑक्टोबरच्या संध्याकाळपासून गावातून गायब होता. घरच्यांनी आणि नातेवाईकांनी शोध घेतला, मात्र काहीही ठावठिकाणा लागला नाही. अखेर २ ऑक्टोबर रोजी गडगा-कंधार रस्त्यालगतच्या सार्वजनिक स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला खडकावर जाळलेला मृतदेह आढळला. पोलिस पाटील संजय भांगे यांनी तत्काळ याची माहिती नायगाव पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक शाम पानेगावकर, पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड, पोउनि गजानन तोटेवाड, सपोउनि. गजानन पेदे, बालाजीराव शिंदे यांच्यासह श्वानपथक, उसे तज्ज्ञ व फॉरेन्सिक लॅब पथक घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान बिअर दारूच्या बाटल्या, दगड, चप्पल वांसारखी संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आली.

मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी घटनास्थळाचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठविण्यात आले होते. काही वेळातच मयताची ओळख पटली. त्यानंतर मुलाचे वडील व नातेवाईक घटनास्थळी दाखल होऊन जिशान असल्याचे सांगितले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नायगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

संशयावरून खून आरोपीला अटक

"माझ्या बायकोकडे तू वाईट नजरेने पाहतोस" या संशयावरून मित्रानेच मित्राचा खून करून प्रेत गडगाकौठा रोडवर टाकल्याची थरकाप उडवणारी घटना उघडकीस आली आहे. १७ वर्षीय जिशान लतीफ सय्यद याचा त्याच गावातील अब्बास रमजानसाब शेखने खून केला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

खुनाची सर्वत्र चर्चा

मृत्यूचे वृत्त कळताच वडील व नातेवाईक त्या ठिकाणी आले असता नातेवाईकांपैकी एकाच्या अंगावर धावून जाऊन चपलीने वडिलांनी एकास मारले व तुने घात किया, असे शब्द काढल्याचे प्रत्यक्ष उपस्थित असलेल्यांनी सांगितले. यामध्ये पोलिस माहिती देण्यास टाळाटाळ करीत असून पोलिस तपासात काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT