Nanded Gambling Raid pudhari photo
नांदेड

Nanded Gambling Raid : जुगार अड्ड्यावर छापा; चौघांना अटक, १.७६ लाखांचा मुद्देमाल जप्त

मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

​नांदेड : नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मुदखेड पोलिसांनी उमाटवाडी शिवारात सुरू असलेल्या ‘अंदर-बाहर’ जुगार अड्ड्यावर धडक कारवाई केली. या छाप्यात चौघांना ताब्यात घेण्यात आले असून रोख रक्कम व मोबाईल फोनसह एकूण १ लाख ७६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुदखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक २२ नोव्हेंबर रोजी रात्री हद्दीत गस्त घालत होते. उमाटवाडी गावच्या गायरान जमिनीतील लिंबाच्या झाडाखाली पैशांवर ‘अंदर-बाहर’ जुगार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळी छापा टाकला. तेथे गोल रिंगण करून पत्त्यांवर जुगार खेळताना काही जण आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच काही संशयित अंधाराचा फायदा घेत पसार झाले; मात्र पोलिसांनी घेराव घालून चौघांना जागीच पकडले.

जगन संभाजी सोमवारे (वय ४६, रा. येळी, ता. लोहा), भुजंग केशव शिंदे (वय २३, रा. रोही पिंपळगाव, ता. मुदखेड), संभाजी गंगाधर जाधव (वय २४, रा. डोनवाडा, ह.मु. माळकोठा, ता. मुदखेड) आणि कृष्णा दिगंबर कल्याणे (वय २४, रा. मुगट, ता. मुदखेड) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

पंचासमक्ष केलेल्या झडतीत ६ हजार ६०० रुपये रोख, विविध कंपन्यांचे सुमारे १ लाख ७० हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन आणि जुगाराचे साहित्य असा १,७६,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव व अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी माणिक बेद्रे, पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि राजेश नंद, सुरेश जाधव, आकाश सरोदे आणि अंमलदार महेंद्रकुमार कवठेकर, कदम, चव्हाण यांनी ही कारवाई केली. अवैध धंद्यांची माहिती देऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT