MP Ashok Chavan criticizes the opposition
लोहा, पुढारी वृत्तसेवा: बाप त्या उंचीचा होता आणि बापाची पुण्याई देखील आहे हे माझे भाग्य आहे. खालच्या पातळीवर जाऊन टीका करून काही विरोधकांना राजकारणाची सवय झाली आहे. अशा राजकारणाचा एकजुटीने उभे राहून भाजपच्या मागे शक्ती उभी करा, असे आवाहन खा. अशोक चव्हाण यांनी लोहा येथे संवाद बैठकीत केले आहे.
लोहा येथे भाजपा कार्यकर्त्यांचा संवाद बैठक व भाजपाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन असा दुहेरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपाचे नांदेड महानगराध्यक्ष अंबरनाथ राजूरकर, केरबा सावकार, गजानन सूर्यवंशी, शरद पवार, चंद्रसेन पाटील, डॉ सुनील धोंडगे, अॅड. विजय धोंडगे, एकनाथ पवार, गंगाप्रसाद यन्नावार आदी उपस्थित होते.
खा. चव्हाण म्हणाले की, विरोधकांचा समाचार घेतला शंकरराव चव्हाण यांची पुण्याई आणखी संपलेली नाही त्यांची पुण्याई आजही आहे. मी बापाचे नाव घेऊन राजकारण करत असल्याची टीका करण्यात आली. पण माझा बाप त्या उंचीचा होता, हे माझे भाग्यच आहे असे सांगून अशोकराव चव्हाण यांनी अप्रत्यक्ष आ. चिखलीकर यांना टोमणा मारला. काही लोकांना खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करण्याची सवय जडली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
भाजपा शहर कार्यालयाचे उद्घाटन
लोहा शहरातील विश्वनाथ संकुल येथे माजी नगराध्यक्ष तथा शहर मंडळ अध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी भाजपाचे संपर्क कार्यालय सुरू केले असून या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन खा. अशोक चव्हाण, माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.