Nanded News : हवामान केंद्राचे पाचव्यांदा मुसळधार पावसाचे संकेत Pudhari
नांदेड

Nanded News : हवामान केंद्राचे पाचव्यांदा मुसळधार पावसाचे संकेत

पुष्याकडून आशा : यंदाच्या पावसाळ्यात आजवर २४ टक्के पाऊस

पुढारी वृत्तसेवा

Meteorological Center warns of heavy rain for the fifth time

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : शुक्रवारी प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्र, मुंबईने पुन्हा एकदा इशारा दिला आहे. त्यानुसार पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे. या महिन्यात हा पाचवा अंदाज असून यापूर्वीचे चारही अंदाज फेल गेले आहेत. दरम्यान, शुक्रवारी सकाळी झालेल्या नोंदीनुसार या पावसाळ्यात आतापर्यंत वार्षिक सरा-सरीच्या २४ टक्के पाऊस झाला आहे.

वेगवेगळ्या खाजगी पातळीवरील तसेच शासनाच्या सुद्धा हवामान तज्ज्ञांनी यावर्षी सुरुवातीपासून चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली होती. प्रत्यक्षात मात्र पावसाचा प्रवास दरवर्षीप्रमाणेच सुरू आहे. सध्या पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी जिल्हयात पावसाने जेमतेम २०० मिलीमीटरचा टप्पा ओलांडला. आज रोजीपर्यंत जो सरा-सरी पाऊस पडतो, त्याच्या तुलनेत आजवर केवळ ७२.२८ टक्के पाऊस झाला आहे. तर वार्षिक सरसरीच्या तुलनेत त्याची नोंद २४ टक्के भरते.

वास्तविक वरील आकडेवारी फारशी निराशाजनक नसली तरी ती केवळ एकाच पावसाने तिथपर्यंत पोहोचली. त्या पावसाचा भूजलस्तराला तसेच जलसाठ्यांना फारसा फायदा झालेला नाही. तसेच जिल्ह्यात सर्वदूर सुद्धा समाधानकारक पाऊस झालेला नाही. ठराविक मंडळामध्येच पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. उर्वरित भाग अद्याप कोरडाच आहे.

सद्यस्थितीत पिकांची परिस्थिती चांगली असली तरी शक्यतो लवकर पावसाची नितांत गरज आहे. अन्यथा किडीचे प्रमाण वाढत जाऊन पुढे पिकाचा उतारा चांगला येणार नाही, अशी भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होते आहे.

जलाशयांत अद्यापही आवक नाही

मराठवाड्यात केवळ जायकवाडी प्रकल्पाची स्थिती समाधानकारक आहे. उर्वरित जलाशयांमध्ये पाण्याची अजिबात आवक नाही. त्यामुळे पुढे पिण्यासाठी तसेच पिकांसाठी पाण्याची समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त होते आहे. दरम्यान, शनिवारी सूर्य पुष्य नक्षत्रात प्रवेश करीत असून इथून पुढे दरवर्षीच चांगला पाऊस पडतो. तसे झाल्यास पुढचे दिवस जोरदार पावसाचे असतील, अशी अपेक्षा व्यक्त होते आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT