'मसाप'चा कविता दिन यंदा नांदेडमध्ये; तांबोळी - सातारकर यांना पुरस्कार file photo
नांदेड

'मसाप'चा कविता दिन यंदा नांदेडमध्ये; तांबोळी - सातारकर यांना पुरस्कार

मराठवाडा साहित्य परिषदेचा 'कविता दिन' हा कार्यक्रम यंदा नांदेडमध्ये आयोजित करण्यात आला नाही.

पुढारी वृत्तसेवा

'Masap's' Poetry Day in Nanded this year; Tamboli - Satarkar to receive awards

नांदेड, पुढारी वृत्तसेवा

मराठवाडा साहित्य परिषदेचा 'कविता दिन' हा कार्यक्रम यंदा नांदेडमध्ये आयोजित करण्यात आला असून ह्या कार्यक्रमातच ज्येष्ठ साहित्यिक प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी आणि कवयित्री प्रा. योगिनी सातारकर यांना गौरविण्यात येणार आहे.

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा २७फेब्रुवारी हा जन्मदिवस मसापतर्फे 'कविता दिन' म्हणून साजरा केला जातो. मसापने यंदाचा कुसुमाग्रज काव्यपुरस्कार प्रा. तांबोळी यांना तर लीला धनपलवार विशेष काव्यपुरस्कार प्रा. सातारकर यांना अलीकडे जाहीर केला. ख्यातनाम समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या हस्ते वरील पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

कविता दिन आणि पुरस्कार प्रदानाचा कार्यक्रम २७ फेब्रुवारी रोजी नांदेड येथे विसावा हॉटेलच्या सभागृहात होणार असून याप्रसंगी वक्ते म्हणून प्रा. नागनाथ पाटील आणि प्रा. पी. विठ्ठल उपस्थित राहणार आहेत.

वरील कार्यक्रमास साहित्यप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन मसापतर्फे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह प्रा. दादा गोरे तसेच नांदेड शाखेचे अध्यक्ष बालाजी इबितदार व अन्य पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT