Umarkhed, Pusad ATS Raid Pudhari
नांदेड

Maharashtra ATS Raid | राज्यात दहशतवादविरोधी पथकाची मोठी कारवाई : उमरखेडसह २० ठिकाणी मध्यरात्री छापे

Nanded ATS Action | उमरखेड परिसरात यापूर्वीही अतिरेकी संघटनांच्या हालचालींच्या नोंदी आढळल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क

पुढारी वृत्तसेवा

Umarkhed, Pusad ATS Raid
प्रशांत भागवत

उमरखेड : राज्यात अतिरेकी आणि जातीय तेढ निर्माण करण्याच्या संभाव्य हालचालींच्या पार्श्वभूमीवर Maharashtra Anti-Terrorism Squad (एटीएस)ने मध्यरात्री मोठी कारवाई करत उमरखेड, पुसद तसेच राज्यातील सुमारे २० ठिकाणी छापेमारी केल्याची माहिती पुढे आली आहे.

एटीएसचे प्रमुख चंद्रशेखर मेढा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. स्थानिक पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात रात्रभर विविध ठिकाणी तपास आणि चौकशी सुरू होती. संपूर्ण कारवाई अत्यंत गोपनीयतेने पार पडल्यामुळे अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही संशयास्पद हालचाली तसेच तरुणांना भडकावून देशविघातक कृत्यांमध्ये ओढण्याच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर ही छापेमारी करण्यात आली. उमरखेड परिसरात यापूर्वीही अतिरेकी संघटनांच्या हालचालींच्या नोंदी आढळल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्याचे चित्र आहे.

दरम्यान, उपविभागीय अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “ही कारवाई वरिष्ठ स्तरावरून सुरू होती. आम्ही केवळ सुरक्षा व्यवस्थेसाठी उपस्थित होतो. अधिकृत तपशील आमच्याकडे उपलब्ध नाही.”

या घडामोडींमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणाबाबत अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT