Nanded news | मुक्रमाबाद येथे प्रस्तावीत अप्पर तहसिल कार्यालय होणार
मुखेड : मुखेड तालुका विस्ताराने भौगौलिकदृष्ट्या नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. मुक्रमाबाद हे मुखेड तालुक्यात असले तरी प्रशासकीय कामकाजासाठी मुखेडला ये-जा करणे, तेथिल नागरीकांना अडचणीचे ठरत असल्यामुळे मुक्रमाबादला अप्पर तहसिल कार्यालय मंजुर करावे अशी मागणी आ.डाॅ. तुषार राठोड यांनी मुख्यमंत्र्याकडे केली होती.
महसुल मंत्री बावनकुळे यांची भेट घेवुन मुक्रमाबादला अप्पर तहसिलची आवश्यकता पटवुन देवुन पाठपुरावा केला होता. अखेर त्याच्या पाठपुराव्याला यश आले असुन नुकतेच शासनाने विभागीय आयुक्त संभाजीनगर यांना आदेशीत करुन प्रस्तावीत मुक्रमाबाद येथे अप्पर तहसिल कार्यालय स्थापन करणे संबंधी नऊ निकशासह आवश्यक तपशिल व माहीती पाठवण्याचे आदेशीत करण्यात आले. नुकतेच कार्यासन अधिकारी प्रशांत सपकाळ यांनी 13 जानेवारीला विभागीय आयुक्त संभाजीनगर यांना पत्र पाठवुन आदेशीत केले आहे.
नांदेड जिल्यात नांदेड, तामसा, मुक्रमाबाद व इस्लापुर तेथे अप्पर तहसिल कार्यालयासाठी समावेश आहे. ह्या मागणीसाठी वेळोवेळी आ.डाॅ.राठोड यांनी मंत्रालयात पाठपुरावा केल्याने हे शक्य झाल्याची प्रतिक्रीया मुक्रमाबाद करानी दिली आहे. भविष्यात उदगीर जिल्ह्याचा विचार झाल्यास मुक्रमाबाद येथील अप्पर तहसिल मंजुरी महत्वाची ठरते.
मुखेड मुक्रमाबाद हे अंतर जवळपास 40 कि.मी. असून तेथुन तहसिलच्या कामासाठी त्या भागातील लोकांना पुर्ण दिवस लागत होता. एका कामासाठी दोन तिन चकरा माराव्या लागत असल्याने वेळ व पैसा खर्चुन ही वेळेवर कामे होत नव्हती. या कारणाने मुक्रमाबादला अप्पर कार्यालय झाले पाहीजे ही आग्रही भुमीका आ. डाॅ. राठोड यांनी घेतली व वेळोवेळी मुख्यमंत्र्याच्या दरबारात ह्या मागणीसाठी सततचा पाठपुरावा केला. तसेच महसुलमंत्री बावनकुळे यांना ही वस्तुनिष्ठ माहीती देवुन अप्पर तहसिलच्या आवश्यकतेवर भर दिला होता. या मागणीच्या अनुषंगाने मुखेड तहसिल प्रशासनाने नऊ निकषाच्या पुर्ततेसह सकारात्मक अहवाल पाठवला होता.

