Madhav Bhandari : काहींना न्याय तर काहींवर अन्याय  File Photo
नांदेड

Madhav Bhandari : काहींना न्याय तर काहींवर अन्याय

भाजपा प्रवक्ते माधव भांडारींची माहूरमध्ये कबुली

पुढारी वृत्तसेवा

Madhav Bhandari: Justice for some, injustice for others.

श्रीक्षेत्र माहूर, पुढारी वृत्तसेवा "राजकीय पक्षात काम करत असताना काहींना न्याय मिळतो, तर काहींवर अन्याय होतो. हे काही आजचे नाही, तर ही बाब पूर्वापार चालत आली आहे, " अशी सूचक कबुली भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी येथे दिली.

शुक्रवारी (दि. २) माधव भांडारी यांनी श्री रेणुकामाता मंदिरात हजेरी लावून आदिशक्तीची विधिवत पूजाअर्चा केली. दर्शनानंतर शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पक्षांतर्गत घडामोडींसह आगामी निवडणुकांवर भाष्य केले.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याबाबत विचारले असता भांडारी म्हणाले की, "ही एक स्वाभाविक बाब आहे. आपल्या कार्यकर्त्यांचे भवितव्य लक्षात घेऊनच शरद पवार यांनी तसा निर्णय घेतला असावा. आम्ही यापूर्वीही त्यांच्या विरोधातच लढलो आहोत, त्यामुळे या युतीमुळे भाजपाचा कार्यकर्ता कुठेही भरडला जाणार नाही," अशी ग्वाही त्यांनी दिली.

"तुम्हाला विधान परिषदेवर संधी मिळेल का?" या प्रश्नावर मात्र त्यांनी सावध पवित्रा घेतला. "मी वैयक्तिक प्रश्नांना उत्तरे देत नाही," असे म्हणत त्यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले.

यावेळी भाजपाचे युवानेते अॅड. रमण जायभाये, तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के, शहराध्यक्ष गोपू महामुने तालुका सरचिटणीस विनायक मुसळे, अनिल वाघमारे, नंदकुमार जोशी, विजय आमले, अपील बेलखोडे, रामकृष्ण केंद्रे, निलेश तायडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उमेदवारीसाठी भाजपमध्ये मोठी चुरस

भाजपामध्ये सध्या इतर पक्षातून येणाऱ्यांची रिघ लागली असल्याच्या प्रश्नावर भांडारी म्हणाले की, "नांदेडमध्ये तब्बल ८१ जागांसाठी ५३१ इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. यावरून भाजपामध्ये काम करण्याची आणि निवडणूक लढवण्याची कार्यकर्त्यांची इच्छाशक्ती किती प्रबळ आहे, हे स्पष्ट होते."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT