Nanded News : तोट्यातील 'भाऊराव चव्हाण'ची विस्तारीकरणाची मोठी योजना !  File Photo
नांदेड

Nanded News : तोट्यातील 'भाऊराव चव्हाण'ची विस्तारीकरणाची मोठी योजना !

मागील काही वर्षात आपल्या समूहातील दोन प्रकल्पांची विक्री करून कर्जाचा भार कमी करणाऱ्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने आता येळेगाव आणि डोंगरकडा येथील दोन्ही प्रकल्पांच्या गाळप क्षमतेचे विस्तारीकरण करण्याचे ठरवले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Loss-making 'Bhaurav Chavan' has a big expansion plan

विशेष प्रतिनिधी

नांदेड : मागील काही वर्षात आपल्या समूहातील दोन प्रकल्पांची विक्री करून कर्जाचा भार कमी करणाऱ्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने आता येळेगाव आणि डोंगरकडा येथील दोन्ही प्रकल्पांच्या गाळप क्षमतेचे विस्तारीकरण करण्याचे ठरवले आहे. कारखान्याला मागील हंगामात नाममात्र नफा झाला, तरी एकूण संचित तोटा ५० कोटींच्या घरात गेला आहे.

वरील कारखान्याची ३२वी वार्षिक सभा गेल्या महिनाअखेर घेण्यात आली. त्यानंतर दसण्याच्या मुहूर्तावर दोन्ही प्रकल्पांत बॉयलर पेटविण्याचा कार्यक्रम प्रचलित प्रथेनुसार झाला. या कारखान्याची वार्षिक सभा होण्याच्या दोन दिवस आधी 'मांजरा' कारखान्याने यंदाच्या हंगामात उसासाठी किमान ३१५० रु प्रतिटन भाव देण्याचे जाहीर केले होते; पण 'भाऊराव चव्हाण'ने किमान दराची घोषणा न करताच, चंदाच्या हंगामाची तयारी सज्जता केली आहे.

जिल्ह्यातील एका आमदाराने ऊस दराच्या मुद्यावरून 'भाऊराव चव्हाण च्या कर्त्याभर्त्यांना डिवचल्यानंतर साखर कारखानदारीतील 'रसा 'शोशी ज्यांचा संबंध नाही, अशा काही अशोक चव्हाण समर्थकांनी बरील आमदारावर कडवट प्रतिक्रिया मोडविल्या. कलंबर कारखान्याची बाट लावणाऱ्या या आमदाराने केवळ सरवरच्या माहितीवरच निशाणा सामला होता, त्यास उत्तर देण्यात आले, तरी कोणीही या कारखान्याच्या एकंदर स्थितीची माहिती दिली नव्हती, ती आता समोर आली आहे.

कारखान्याच्या यंदाच्या वार्षिक सपेसमोर ३२वा बार्षिक अहवाल ठेवण्यात आला. २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात कारखान्याला ७० लाख ५ हजार रुपयांचा नफा झाला; पण आधीच्या वर्षात असलेल्या ४७ कोटी २२ लाख ३४ हजारांच्या तोटयामध्ये नाममात्र घट झाली. आता या कारखान्यावरील तोटा ४६ कोटी ५२ लाख २८ हजार इतका आहे. वर्ष २०२३ अखेर कारखान्याचा तोटा ४९ कोटींवर गेला होता.

त्या एकाच वर्षात तब्बल १७ कोर्टीचा तोटा नोंदला गेला, कारखान्याच्या दोन्ही प्रकल्पांमध्ये साखर उत्पादनासोबतच येळेगाव येथे इथेनॉल प्रकल्प चालविण्यात येतो. साडेसेहेचाळीस कोटींचा तोटा आणि इतर देणी प्रचंड प्रमाणावर असतानाही दोन्ही प्रकल्पांची क्षमता ५ हजार मे. टन गाळपापर्यंत नेण्याची मोठी योजना कारखान्याने आखली आहे. इथेनॉल प्रकल्पाचे मका व खराब अप्रधान्य वापरून डिस्टीलरीजमध्ये रूपांतर करण्याच्या प्रस्तावालाही वार्षिक सभेची मान्यता घेण्यात आली. वेगवेगळ्या योजनांसाठी निधी उभारण्याकरिता व्यक्ती, संस्था आणि कंपन्यांकडून ठेवी किंवा कर्जे घेण्यास सभासदांची मंजुरी घेण्यात अवली; पण या सर्व बार्बोचा तपशील अहवालामध्ये देण्यात आलेला नाही.

गेल्या एप्रिल महिन्यात कारखान्याच्या नेतृत्वात बदल करण्यात आला. अनेक वर्षे अध्यक्ष राहिलेल्या गणपतराय श्यामराय तिडके यांच्या हाती नारळ देत त्यांच्या जागी नरेन्द्र भगवानराव चव्हाण यांची अध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली. त्यांच्या अध्यक्षतेखाली पहिलीच वार्षिक सभा शांततेत आणि सुरळीत पार पडली, तरी कारखान्याच्या ताळेबंदात मात्र सुरळीतपणा दिसून आला नाही. त्यावर चर्चा घडवून आणण्याच्या भानगडीत कोणीही पडले नाही. अशा पार्श्वभूमीवर हा कारखाना आगामी हंगामासाठी सज्या झाला आहे.

साखर कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी क्षमतेइतके ऊस गाळप होणे आवश्यक आहे. तथापि मागील दोन गळीत हंगामांमध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील बराच ऊस अन्य साखर कारखान्यांकडे गेल्यामुळे आमच्या कारखान्यात उद्दिष्टाप्रमाणे गाळप होऊ शकले नाही. त्यामुळे कारखान्यास आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
नरेन्द्र बव्हाण अध्यक्ष, भा.च.स.सा. कारखाना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT