Latur Nanded Highway Tanker Collision  Pudhari
नांदेड

Nanded Accident | लातूर - नांदेड मार्गावर एकाच मालकाच्या दोन टँकरची धडक; चालकाचा जागीच मृत्यू

वाडी पाटी पुलावर अपघात, टँकरच्या केबिनचे मोठे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

Latur Nanded Highway Tanker Collision

नवीन नांदेड : लातूरहून नांदेडकडे येणाऱ्या दोन टँकरांची नांदेड रोडवरील वाडी पाटी पुलावर गुरुवारी (दि. ११) सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास भीषण धडक झाली. या अपघातात एका टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही टँकर एकाच मालकाचे असून ते लातूरहून नांदेडच्या दिशेने येत होते. यावेळी मागून येणाऱ्या केए 20 एसी 9809 क्रमांकाच्या टँकरने पुढे असलेल्या केए 20 एसी 9808 क्रमांकाच्या टँकरला माघून जोरदार धडक दिली. या अपघातात चालक संदिपसिंग रमजियासिंग (वय 45, रा. बलिया, उत्तर प्रदेश) याचा जागीच मृत्यू झाला. धडकेची तीव्रता इतकी होती की टँकरच्या केबिनचे मोठे नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT