अविनाश किशन हांडे Pudhari
नांदेड

Nanded Engineer Death | सेल्फीचा मोह बेतला जीवावर; कनिष्ठ अभियंत्याचा नदीत बुडून मृत्यू

कंधार तालुक्यातील बहाद्दरपुरा पुलावरील घटना

पुढारी वृत्तसेवा

Bahaddarpura bridge Junior Engineer drowning

कंधार : नांदेड येथून शासकीय काम पूर्ण करून रावणकोळा (ता. मुखेड) येथे परत जात असताना सेल्फी काढण्याच्या मोहात कनिष्ठ अभियंत्यावर जीव गमवण्याची दुर्दैवी घटना घडली. कंधार तालुक्यातील बहाद्दरपुरा येथील मन्याड नदीचा पुलावर गुरुवारी (दि. २६) संध्याकाळी ही घटना घडली.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की देगलूर येथील कनिष्ठ अभियंता अविनाश किशन हांडे (वय ३४, मुळगाव रावणकोळा, ता. मुखेड) हे उदगीर येथून त्यांचा मित्र चंद्रकांत दबडे हे दोघेजण मोटरसायकलने शासकीय काम करण्यासाठी नांदेड येथे २६ फेब्रुवारी गुरुवार रोजी गेले होते. आपले काम आटोपून कंधार मार्गे रावणकोळा (ता. मुखेड) येथे परत जात असताना कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथील मन्याड नदीच्या पुलावर आले असताना फोटो काढण्याचा मोह अविनाश हांडे यांना आवरता आला नाही.

फोटो काढण्याच्या नादात त्याचा तोल जाऊन पाय घसरून नदीत पडले. त्याच्या सोबतच्या साथीदार चंद्रकांत दबडे यांनी आरडाओरड करून जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु मदतीला कुणी धावून आले नाही त्याला पोहता येत नसल्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला. घटनेनंतर काही वेळाने गावकऱ्यांनी अविनाश ला वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करूनही ते वाचू शकले नाही.

या दुर्देवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार चोपवाड तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT