I will not be swayed by rumors of party change MP Ravindra Chavan
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : मी पूर्वीपासून काँग्रेसचा निष्ठावंत आहे. माझ्या पक्ष बदलाविषयी समाज माध्यमातून उठविलेल्या वावड्या म्हणजे विरोधी पक्षांचे व षडयंत्र असून अशा अफवांमुळे मी डगमगणार नाही. जनतेने - कार्यकर्त्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन खा. -रवींद्र चव्हाण यांनी केले आहे.
खा. रवींद्र चव्हाण हे भाजपमध्ये - प्रवेश करणार असल्याची पोस्ट - सोमवारी सोशल मीडियावर काहींनी टाकल्यामुळे जिल्हाभरात चर्चेला - उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर खा. चव्हाण यांनी ही पोस्ट म्हणजे निव्वळ अफवा असून अशा चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियातून अफवा पसरविणे म्हणजे मला बदनाम -करण्याचा कुटील डाव आहे.
जिह्यात काँग्रेसचे पक्ष संघटन मजबूत होत आहे. इतर पक्षांतील अनेक - पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेसच्या संपर्कात असल्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. काँग्रेस विषयी त्यांच्या उरात धडकी भरल्यामुळे असे जाणीवपूर्वक प्रकार करण्यात येत आहेत.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली असून या निवडणुकीत काँग्रेस जिल्ह्यात नंबर एकचा पक्ष म्हणून सिद्ध होईल, असा विश्वासही खा. रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
या संदर्भातील पोस्ट व्हायरल झाल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांसह पदाधिकारी संतापले असून जिल्हाभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.