Nanded News : जिल्ह्यात घरपोच गॅस वितरण बंधनकारक pudhari File photo
नांदेड

Nanded News : जिल्ह्यात घरपोच गॅस वितरण बंधनकारक

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे गॅस वितरकांना स्पष्ट निर्देश !

पुढारी वृत्तसेवा

Home delivery of gas is mandatory in the district

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेड जिल्ह्यातील गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली २८ मार्च शनिवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात गॅस कंपन्यांचे सेल्स अधिकारी व एजन्-सीधारकांची (वितरकांची) बैठक झाली. या बैठकीत गॅस एजन्सीधारकांनी सर्व ग्राहकांना नोंदणीकृत पत्त्यावरच गॅस सिलिंडर घरपोच देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट निर्देश दिले की, कोणत्याही परिस्थितीत ग्राहकांना एजन्सीवर बोलावून गॅस देऊ नये. तसेच घरपोच वितरणात काही अडचणी निर्माण झाल्यास ग्राहकांनी संबंधित तालुक्यातील पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे. तसेच एजन्सीवर होणारी गर्दी टाळण्यासाठी ग्राहकांनी संयम राखावा आणि बुकिंगनंतर सिलिंडर घरपोच मिळण्याची प्रतीक्षा करावी, असेही कर्डिले यांनी आवाहन केले आहे.

नागरिकांनी गोंधळ न घालता प्रशासनाच्या नियोजनाला सहकार्य करावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, ई केवायसी प्रक्रिया मोबाईलद्वारे पूर्ण करता येणार असून ग्राहकांनी "आधार फेस आरडी" तसेच संबंधित गॅस कंपनीचे अधिकृत अॅप वापरून घरबसल्या पडताळणी करावी, असेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

अर्धापूर येथील ग्राहकांचा जिल्हाधकाऱ्यांना संपर्क

अर्धापूर येथील भारत कंपनीच्या इंदिरा गॅस एजन्सी धारकाकडून गॅस ग्राहकांना वेठीस धरण्याचा प्रकार समोर आला. एजन्सीकडून ग्राहकांनी आता नांदेडवरून सिलिंडर न्यावे असे सांगण्यात आले होते.

यावेळी गॅस ग्राहकांनी संबंधित सिलिंडर वाहतूक करणारी गाडी अडवून धरत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी संपर्क साधला. जिल्हाधिकारी यांच्या हस्तक्षेपानंतर इंदिरा गॅस एजन्सीकडून नोंदणीकृत गॅस ग्राहकांना तत्काळ सिलिंडर वाटप करण्यात आले. त्यामुळे एजन्सीद्वारे ग्राहकांना वेठीस धरण्याचा प्रकार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हाणून पाडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT