Kinwat Heavy rains
किनवट तालुक्यातील आठ मंडळात सोमवारी मध्यम ते मुसळधार पाऊस पडला. Pudhari News Network
नांदेड

किनवट तालुक्यातील दोन मंडळात अतिवृष्टी

पुढारी वृत्तसेवा

किनवट; पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील उमरीबाजार मंडळ वगळता इतर आठ मंडळात सोमवारी (दि.१५) मध्यम ते मुसळधार पाऊस पडला . सिंदगी मोहपूर मंडळात अतिवृष्टी तर जलधारा मंडळात अतिवृष्टी (160 मि.मी.) झाली. तालुक्यातील यंदाची ही दुसरी अतिवृष्टी ठरली आहे. मंगळवारी (दि.16) सकाळी आठपर्यंत संपलेल्या गत 24 तासांत तालुक्यांतील नऊ मंडळातील एकूण पाऊस 464.2 मि.मी. असून, त्याची सरासरी 51.8 मि.मी. अशी आहे .

जलधारा मंडळात 160 मि.मी. पाऊस

गत चार-पाच दिवसांपासून पाऊस सतत हु्‍लकावणी देत होता. त्यामुळे वाढीतील कोवळ्या पिकांना त्याचा फटका बसून कोमेजली होती. पावसामुळे मरगळलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. तालुक्यात हलका ते मध्यम पाऊस बरसला असून आज अतिवृष्टीची नोंद झाली. नदी-नाले तुडूंब वाहू लागले आहेत. जलधारा मंडळात 160 मि.मी. पाऊस झाल्यामुळे या मंडळात अतिवृष्टी तर सिंदगीमोहपूरमध्ये केवळ अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. आठ दिवसांच्या फरकाने जलधारा मंडळात झालेल्या दोन अतिवृष्टींमुळे त्या सर्कलमधील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे समजते.

किनवट तालुक्यातील पावसाची नोंद

मंगळवारी सकाळी संपलेल्या गत 24 तासांत किनवट तालुक्यातील पावसाची नोंद पुढील प्रमाणे - कंसात 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या मंडळनिहाय एकूण पावसाची नोंद दिलेली आहे. किनवट- 53.8 (362.3 मि.मी.) ; बोधडी- 27.0 (238.0 मि.मी.); इस्लापूर- 52.8(359.7 मि.मी.); जलधारा- 160.0 (547.7 मि.मी.); शिवणी- 40.3(327.6 मि.मी.); मांडवी- 37.5(400.3 मि.मी.); दहेली- 17.0(338.2 मि.मी.), सिंदगी मो. 67.8 (421.4 मि.मी.); उमरी बाजार 08.0 (358.1 मि.मी.).

सर्वाधिक पाऊस जलधारा मंडळात

तालुक्यात एक जूनपासून नऊ मंडळात मिळून आजपर्यंतचा पडलेला एकूण पाऊस 3,353.3 मि.मी.असून, त्याची सरासरी 372.59 मि.मी.येते. आतापर्यंत तालुक्यात सर्वाधिक पाऊस जलधारा मंडळात झाला असून, सर्वात कमी बोधडी मंडळात झालेला आहे. तालुक्यात मंगळवार दि.16 जुलै पर्यंत पडणारा अपेक्षित सरासरी पाऊस 342.9 मि.मी.असून, त्या तुलनेत 108.66 टक्के पाऊस पडलेला आहे.

जलप्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ

01 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यान किनवट तालुक्यात पडणारा सरासरी वार्षिक पाऊस 1026.58 मि.मी. आहे. या तुलनेत आतापर्यंत तालुक्यात 36.29 टक्के पाऊस पडलेला आहे. गतवर्षी आज रोजी पर्यंत तालुक्यात पडलेला एकूण पाऊस 263.30 मि.मी. असून, त्याची टक्केवारी 25.65 होती. त्यामानाने यंदाचे पर्जन्यमान समाधानकारक आहे. या पावसाने तालुक्यातील जलप्रकल्पातील पाणीसाठ्यातही बऱ्यापैकी वाढ झालेली आहे.

SCROLL FOR NEXT