नांदेड-लातूर मार्गावरील भीषण अपघातात बँकेचा कॅशियर ठार

हिराबोरी पाटीजवळ कार ट्रॅक्टरवर आदळली, दोघे जखमी
Prashik Bagde died in an accident
नांदेड - लातूर मार्गावरील अपघातात बँकेचा कॅशियर प्रशिक बागडे याचा मृत्यू झाला. Pudhari News Network

माळाकोळी; पुढारी वृत्तसेवा: नांदेड - लातूर राष्ट्रीय महामार्गावरील माळाकोळीजवळील हिराबोरी पाटीजवळ (ता. लोहा) कार ट्रॅक्टरवर आदळून भीषण अपघात झाला. यात एक जण जागीच ठार झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (दि. २८) रात्री अकरा वाजता घडली. कार मधील सर्व जण माळाकोळी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील कर्मचारी आहेत. 

Prashik Bagde died in an accident
नांदेड : ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन

अपघातील मृताचे आणि जखमींची नावे

बँकेचे रोखपाल प्रशिक सुनील बागडे (वय 24, रा. नागपूर) यांचा जागीच मृत्यू झाला. अभिजीत ढोके (लेखापाल), शेख शादुल (सहाय्यक) हे दोघेजण गंभीर रित्या जखमी झाले. तर आशिष सर हे किरकोळ जखमी झाले.

Prashik Bagde died in an accident
नांदेड: बिजूर शिवारात अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला

बँकेतील कर्मचारी जेवण करून परताना अपघात

याबाबत अधिक माहिती अशी की, माळाकोळी महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील कर्मचारी बँकेचे पीक कर्जाचे काम आटपून जेवण करण्यासाठी बाहेर गेले होते. ते घरी परतत असताना हिराबोरी पाटी येथे त्यांची भरधाव कार (एमएच 24 ए एफ 6617) ट्रॅक्टर टॅालीवर पाठीमागून जोरदार धडकली. कारमधील जखमींना बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर करावा लागला. पाऊस असल्याने अडथळा येत असला तरी माळाकोळी पोलीस कर्मचारी व अन्य नागरिकांनी मदत करून जखमींना तात्काळ नांदेडच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार, राठोड, विनोद भुरे करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news