नांदेड जिल्ह्यातील १७ महसुली मंडळांत अतिवृष्टी File Photo
नांदेड

Nanded Rain : जिल्ह्यातील १७ महसुली मंडळांत अतिवृष्टी

रविकिरणांनी उत्साह : लिंबोटी वगळता सर्व जलाशयांत चांगला साठा

पुढारी वृत्तसेवा

Heavy rains in 17 revenue circles of Nanded district

नांदेड, पुढारी वृत्तसेवा जूनच्या २४ तारखेनंतर जुलैच्या २५ व २६ तारखेला झालेल्या पावसाने जिल्ह्यातील सर्व जलाशयांत समाधानकारक साठा निर्माण झारला आहे. जिल्ह्यातील १७ महसुली मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली असून नांदेड शहरासह तालुक्यातील काही मंडळांचा त्यात समावेश आहे.

दरम्यान, शुक्रवारी सुरु झालेला पाऊस रात्रभर व शनिवारी दिवसभर बरसला, रात्री पावसाने विश्रांती घेतली. परंतु रविवारी सूर्यदर्शन झाले नाही तरी चांगला उघाड पडला. त्यामुळे सुटी लोकांच्या कामी आली. तसेच शेतकऱ्यांनाही शेतातील कामे करणे सोयीचे झाले.

आषाढ महिन्याच्या शेवटी दि. १९ रोजी सूयनि पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश केला आणि वातावरण बदलले. पावसाबद्दल सार्वत्रिक चिंता व्यक्त केली जात असताना चार ते पाच दिवसांत वसुंधरा हिरवीगार झाली. पिकांना तर जीवदान मिळालेच, परंतु गेल्या आठवडयात दोनच दिवसांत जलाशयांत सुद्धा समाधानकारक साठा निर्माण झाला.

मराठवाडधातील सर्वांत मोठे धरण जायकवाडी ८१ टक्‌याच्यावर भरले, माजलगावमध्ये मात्र केवळ १५ टांकेच साठा आहे. नदिड जिल्ह्यासाठी फायदेशीर येलदरी ७३०.३६ टक्के, सिद्धेश्वर ५०.८२, लोअर दुधना ५४.७९, लोअर मानार ५६.५६ व वाशिम जिल्ह्यातील इसापूर धरणात ७०.१९ टक्के एवढा चांगला साठा निर्माण झाला आहे.

विष्णुपूरी प्रकल्पातून ३६.५७० द.ल.घ.मी. पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे त्याखालील आमदरा, चलेगाव हे बंधारे सुद्धा भरले आहेत. आमट्टा बंधा-यातून ४२,६००, बळेगाव बंधा-यातून आणि चाभरीतून ७०.२५० द.ल.घ.मी. पाणी पुढे सोडले जात असल्याने येत्या काळात निजामसागर व पोचमपाड या भरणाचा साठा वाहणार आहे.

शनिवारचा पाऊस सर्वदूर संततधार स्वरुपात झाला. पावसात सातत्य असले तरी विध्वंसक जोर नव्हता. त्यामुळे हा पाऊस पिकांसाठी, जलाशयांसाठी तसेच भूजलस्तर उंचावण्यासाठी फायदेशीर ठरला. पुढील दोन दिवस उघाड आणि ऊन राहिल्यास आरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार नाही. दरम्यान, नांदेड शहरातील विविध भागात रस्त्यांची सुरु असलेली कामे पावसाने धांवली असून लोकांची मात्र कमालीची गैरसोय झाली. अलिकडेच झालेले डांबरी रस्ते उखडून गेल्याने लोकांचा मनस्ताप झाला. याच दिवसांत जमिनीखालून वीज पुरवठ्याची केबल टाकण्याचे काम सुरु असल्याने विविध रस्ते खोदण्यात आले, त्यामुळेही हातपाईची परिस्थिती निर्माण झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT