आरोग्य योजनेंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी pudhari photo
नांदेड

Health Scheme Achievement : आरोग्य योजनेंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी

2025 मध्ये 7 हजारांहून अधिक गरीब रुग्णांना मिळाला मोफत उपचार

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णूपुरी, नांदेड येथे आयुष्यमान भारत योजना व सलग्नित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून, या योजनेंतर्गत रुग्णसेवेच्या क्षेत्रात एक उल्लेखनीय व आदर्शवत कामगिरी करण्यात आलेली आहे.

माननीय अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या सक्षम नेतृत्वाखाली तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या अध्यक्षा व उप-अधिष्ठाता डॉ. शीतल राठोड-चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयाने राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवेच्या दर्जात लक्षणीय भर घातली आहे.महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत सन 2025 या कालावधीत एकूण 7041 पेक्षा अधिक गरीब, गरजू व सर्वसामान्य रुग्णांना गंभीर व अतिगंभीर आजारांवरील उपचार पूर्णतः विनामूल्य स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

यामुळे रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णांच्या आरोग्यस्थितीत लक्षणीय सुधार झाल्याचे निदर्शनास येत आहे.या कालावधीत योजनेंतर्गत उपचारांपोटी शासनाकडे एकूण रु. 18 कोटी 85 लक्ष 47 हजार 800 इतकी विमा रक्कम प्राप्त झाली असून, सदर रकमेतून रुग्णांच्या निदानासाठी आवश्यक असलेल्या विविध तपासण्या, औषधोपचार व शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत.

सद्यस्थितीत रुग्णालयात विविध आजारांवर अद्ययावत व सक्षम उपचार सुविधा कार्यान्वित असून, सर्व विभागांमार्फत समन्वयाने रुग्णसेवा देण्यात येत आहे.महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. के. अंबुलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हिप रिप्लेसमेंट, नी रिप्लेसमेंट तसेच मणक्याच्या गंभीर शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या असून अनेक रुग्णांना नवजीवन मिळाले आहे.

औषधवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. शीतल राठाड-चव्हाण तसेच डॉ. कपिल मोरे, डॉ. उबेदुल्ला खान, डॉ. अंजली देशमुख, डॉ.फारुखी राफे यांच्या मार्गदर्शनाखाली जीबीएस, ब्रेन हॅमरेज, हार्ट अटॅक यांसारख्या अतिगंभीर रुग्णांवर प्रभावी उपचार करून त्यांना पूर्णतः बरे करून घरी सोडण्यात आले.

शल्यचिकित्सा शास्त्र विभागप्रमुख डॉ. अनिल देगावकर, डॉ. केळकर व डॉ. सुनील बोंबले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्करोगावरील शस्त्रक्रिया तसेच पोटाच्या व आतड्याच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया योजनेंतर्गत यशस्वीपणे पार पाडण्यात आल्या.बालरोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ. किशोर राठोड, डॉ. सलीम तांबे, डॉ. अरविंद चव्हाण व डॉ. गजानन सुरेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निओ-नेटल बेबी केअर, कमी वजनाची नवजात अर्भके तसेच पीआयसीयू मधील अतिगंभीर बालरुग्णांना योजनेंतर्गत उपचार देऊन जीवनदान देण्यात आले.

स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. आर. वाकोडे, डॉ. फसिया व डॉ. शिरीष धुलेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गर्भाशयाच्या कर्करोगावरील शस्त्रक्रिया तसेच दुर्बिणीद्वारे (लॅप्रोस्कोपी) महिलांच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या.कान-नाक-घसा विभागप्रमुख डॉ. आतिश गुजराती व त्यांच्या टीमने एंडोस्कोपी सायनस सर्जरी, थायरॉईड सर्जरी तसेच कानाच्या विविध गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया गरजू रुग्णांवर केल्या.

  • अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, उप-अधिष्ठाता डॉ. हेमंत गोडबोले, उप-अधिष्ठाता व अध्यक्षा डॉ. शीतल राठोड-चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कापसे, वैद्यकीय उप-अधीक्षक डॉ. अजय वराडे व डॉ. देवसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिरे, जनजागृती मोहिमा व नियमित आरोग्य तपासणी उपक्रम राबविण्यात आले.सर्व विभागांच्या प्रशासनाचा सक्रिय सहभाग व सहकार्यामुळे एका वर्षात 7041 रुग्णांना योजनेचा लाभ देणे शक्य झाले. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत राबविण्यात आलेली ही उत्कृष्ट रुग्णसेवा समाजातील आरोग्य समस्यांवर मात करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा असून, प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्याचा अधिकार या रुग्णालयामार्फत सुनिश्चित करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT