Give a special package to Nanded district for heavy rains: MLA Pratap Patil Chikhlikar
-लोहा, पुढारी वृत्तसेवा : ढगफुटीच्या सहश्य परिस्थितीमुळे जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात अतिवृष्टी झाली. लोहा कंधार सह अन्य तालुक्यात पुरामुळे शेती, मानवी वस्ती, छोटे मोठे दुकानदार यांचे प्रचंड नुकसान झाले न आहे. त्यामुळे अतिवृष्टीचे नियम बाजूला ठेवून नांदेड जिल्ह्यासाठी मदतीचे विशेष पॅकेज जाहीर न करावे, तसेच नदीकाठच्या शेतीसाठी विशेष वाब म्हणून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी र मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली आहे.
लोहा कंधार तालुक्यात २८ व २९ ऑगस्ट रोजी मागील चार दिवसात ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी झाली. त्यामुळे पूरपरिस्थिती उद्भवली. शेती, दुकाने, अनेक गावात घराचे मोठे नुकसान झाले. जीवनोपयोगी साहित्य पाण्यात गेले, जनावरे वाहून गेली. आमदार प्रताप पाटील - चिखलीकर हे २८ तारखेपासून दोन्ही तालुक्यात पूरग्रस्त भागात सकाळ पासून नागरिकांना शेतकऱ्यांना भेटून त्याच्या अडीअडचणी जाऊन घेत आहेत.
त्यांना धीर देत आहेत. महालक्ष्मी सणाच्या दिवशी सकाळीच आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आठ वाजल्यापासून गगणबीड हाडोळी, माळेगाव यात्रा, बेरळी, सावरकर नसरत, लोहा, शेलगाव, पिंपळगाव ढगे या गावात जाऊन नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. नागरिकांशी संवाद साधला त्याच्या सोबत तहसीलदार विठ्ठल परळीकर सा.बां. विभागाचे उपअभियंता मोहन पवार, बांधकाम विभाग उपअभियंता शिवाजी राठोड, तालुका कृषी अधिकारी कासराळे, लघु पाटबंधारे अभियंता बनसोडे, जलसंधारण कंधार अभियंता उत्तम गायकवाड, एपीआय मुळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी अशोक भोजराज, महावितरण अभियंता गच्चे, माजी सभापती आनंदराव पाटील शिंदे, माजी जिप सदस्य देविदास गीते, उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, साहेबराव काळे, भास्कर पाटील, नरेंद्र गायकवाड, माजी उपसभापती बालाजी पाटील यासह संबंधित गावातील तलाठी ग्रामसेवक उपस्थित होते.
नैसर्गिक आपत्तीच्या काळात राजकारण न करता सर्वांनी मिळून आपत्तीग्रस्त भागात मदत करावी, सरकार या पूरग्रस्त व नुकसान ग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी सक्षम आहे, असे प्रतापराव पाटील प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले.
आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अतिवृष्टीबाबतचे नियम बाजूला ठेवून जिल्ह्यासाठी विशेष अनुदान जाहीर करावे, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केले आहे. तसेच नदी काठच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे जमीन खरडून गेली आहे. त्या शेतकऱ्यांना जास्तीची मदत द्यावी, तसेच छोटेमोठे दुकानदार याची हानी झाली त्यांनाही मदत व्हावी. काही नियम व अटी बाजूला ठेवून जास्तीतजास्त मदत पूरग्रस्त भागात व्हावी, अशी मागणी आमदार चिखलीकर यांनी केली.