Gharkul beneficiaries will get relief
किनवट, पुढारी वृत्तसेवा किनवट शहरातील घरकुल लाभार्थ्यांसाठी एक दिलासादायक घडामोड घडली असून, प्रलंबित असलेले उर्वरित हप्ते लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. आमदार भिमराव केराम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश लाभले असून, येत्या आठ ते दहा दिवसांत हा निधी वितरित होणार आहे.
माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर परिषद अंतर्गत मंजूर झालेल्या पाच सविस्तर प्रकल्प अहवालांतील (डीपीआर) ९४१ लाभार्थ्यांना या निधीचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. संबंधित निधी केंद्र शासनाच्या मंजुरीनंतर आता अंतिम टप्प्यात असून, वितरण प्रक्रियेस लवकरच प्रारंभ होणार आहे.
या योजनेच्या प्रभावी अंमलबजा-वणीसाठी नगर परिषद मुख्याधिकारी डॉ अजय कुरवाडे, घरकुल अभियंता राहुल सातुरवार आणि नगररचना विभागप्रमुख स्वानंद मामीलवाड यांनी महत्त्वपूण समन्वय साधत अहोरात्र परिश्रम घेतले त्यामुळे निधीच्या वितरणात अडथळा न येता लाभार्थ्यांपर्यंत रक्कम थेट पोहोचवण्याचा मार्ग मोकळा झाल आहे.
या निर्णयामुळे अनेक गरज कुटुंबांना नवजीवनाची आशा मिळाल आहे. अनेकांना घरकुलाचे काम अर्धवट थांबवावे लागले होते, तर काहींन वैयक्तिक कर्ज घेऊन बांधकाम पूर्ण केले होते. त्यामुळे उर्वरित हप्त्याच्य मंजुरीमुळे त्यांच्या अडचणी काह प्रमाणात सुटणार आहेत. लाभार्थ्यांन आपली बँक खाती व आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले