Nanded News : भाजपाच्या चार आमदारांची पोलिस प्रमुखांविरुद्ध तक्रार !  File Photo
नांदेड

Nanded News : भाजपाच्या चार आमदारांची पोलिस प्रमुखांविरुद्ध तक्रार !

थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव : सर्वच लोकप्रतिनिधींचा मान राखला जाण्याची अपेक्षा

पुढारी वृत्तसेवा

Four BJP MLAs file complaint against police chief!

विशेष प्रतिनिधी

नांदेड : तडफदार, कडक आणि शिस्तप्रिय ही आपली प्रतिमा मागील १० महिन्यांत ठळक करणारे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्या कार्यशैलीवर नाराज असलेल्या भारपाच्या चार आमदारांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची भेट घेऊन आपले गाहाणे मांडल्याची माहिती समोर आली आहे, मात्र या आमदारांनी त्यांच्या बदलीची मागणी केलेली नाही.

अविनाशकुमार गेल्या ऑगस्ट महिन्यापासून पोलीस प्रशासनाचे प्रमुख म्हणून जवाबदारी सांभाळत आहेत. त्याआधी ते नांदडलाच अतिरिक्त पोलिस अधीक्षक होते. याच कालावधीत त्यांनी जिल्ह्यात चांगली छाप पाडल्यामुळे तरकालीन पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या बदलीनंतर त्यांच्याजागी अबिनाशकुमार यांची नियुक्ती झाली.

मागील दहा महिन्यांतील त्यांचा एकंदर कार्यकाळ नागरिकांच्या दृष्टीने चांगला समजला जातो. राजकीय पक्षांच्या आजी-माजी लोकप्रतिनिधीशी त्यांनी आतापर्यंत चांगला समन्वय राखला, असेही मानले जाते. भाजपाच्या दोन माजी आमदारांचे अंगरक्षक कायम ठेवण्याचे सौजन्यही त्यांनी दाखविले; पण जिल्ह्याचे नेते अशोक चव्हाण आणि त्यांचे प्रतिस्पर्धी प्रताप पाटील विखलीकर यांची मर्जी राखली की, सारे काही आलबेल, अशी प्रशासनातील वरिष्ठांची मानसिकता तयार झाली असून त्वामुळे महायुतीच्या इतर आमदारांचा स्वाभिमान दुखावला गेला आहे.

जिल्ह्यात सर्व आमदार महायुतीचे आहेत. भाजपाचे दोन राज्यसभा सदस्यही स्थानिकच असले, तरी त्यांच्यामध्ये समन्वय नाही, ही बाब अलीकडे वारंवार दिसून आली पोलिस प्रशासनामध्ये खा. अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्याच शब्दाचा मान राखला जात आहे, असे चित्र पाहिल्यानंतर भाज्याचे चार आमदार मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांना एकजपणे भेटले. या भेटीत आम्ही पोलिस प्रमुखांच्या कार्यशैलीवर तक्रार नोंदविल्याचे एका आमदाराने बुधवारी 'पुढारी'ला सांगितले.

वरील आमदारांनी आपल्या मतदारसंघातील पोलिस ठाण्यांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांसंदर्भात शिफारशीवजा सूचना पोलिस अधीक्षकांकडे केल्या होत्या. पण काहींच्या बाबतीत त्यांचे ऐकले गेले नाही. भाजपाच्या स्थानिक ज्येष्ठ नेत्याजवळ आपली कैफियत मांडण्याचा एक पर्याय या आमदारांसमोर होता. पण या नेत्याकडून सायरत्नभाव अनुभवल्यानंतर या आमदारांनी गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा दरवाजा ठोठावला. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या यंत्रणेमार्फत पोलिस प्रमुखांना आवश्यक तो संदेश सत्वर पाठविल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा पोलीस अधीक्षकांना नदिडहून बदला, अशी मागणी या आमदारांनी केली नाही, केवळ एक-दोघांचा नव्हे तर सर्व लोकप्रतिनिधींचा योग्य तो मान राखला मेला पाहिजे. कोणाचे नाव 'प्रताप' आहे म्हणून त्याचे सारेच ऐकले पाहिजे, अशी कार्यपद्धती नको, ही वरील आमदारांची सामूहिक भावना होती. मी स्वतः पोलिस प्रमुखांचा नेहमीच आदर केला आहे, पण काही बाबतीत वक्रार करावी लागली, असे तक्रार करणाऱ्या एका आमदाराने स्‍पष्‍ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT