माजी आमदार गंगाधर पटने यांचे निधन File Photo
नांदेड

माजी आमदार गंगाधर पटने यांचे निधन

समाजवादी चळवळीचा खांब निखळला

पुढारी वृत्तसेवा

Former MLA Gangadhar Patne passes away

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : समाजवादी विचारसरणीचे ज्येष्ठ नेते, शिक्षण, सहकार आणि ग्रंथालय चळवळीतील कृतिशील कार्यकर्ते, माजी आमदार गंगाधर महालप्पा पटने (८६) यांचे रविवारी (दि.११) नांदेड येथील निवासस्थानी निधन झाले.

त्यांच्या निधनाने समाजवादी चळवळीचा एक आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, आयुष्यभर समाजसेवेचा वसा जपणाऱ्या पटने यांनी मृत्यूनंतरही सामाजिक भान जपत देहदानाचा संकल्प केला होता. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार पटने कुटुंबीयांनी देहदानाची प्रक्रिया पूर्ण कुटुंबीयानी केली.

पटने कुटुंब मूळचे देगलूर तालुक्यातील असले तरी त्यांचे वडील महालप्पा हे वकिली व्यवसायानिमित्त बिलोलीत स्थायिक झाले होते. गंगाधर पटने यांनी बिलोली, हैदराबाद आणि समाजवादी चळवळीचा खांब निखळला.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथून शिक्षण पूर्ण केले. कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही काळ बीड येथील वृत्तपत्रात काम केले आणि शेवटपर्यंत ते पत्रकारितेशी जोडलेले राहिले. बिलोली ही त्यांची कर्मभूमी होती. बिलोली नगरपरिषदेचे अध्यक्षपद त्यांनी दीर्घकाळ भूषविले.

त्यानंतर १९७८ मध्ये ते बिलोली मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. पुढे १९९८ ते २००४ या काळात त्यांनी विधान परिषदेतही प्रतिनिधित्व करत दोन्ही सभागृहांत आपल्या कामाचा ठसा उमटवला. काही वर्षांपूर्वी त्यांच्या तरुण अभियंता पुत्राचे अपघाती निधन झाले होते. हा मोठा आघात पचवूनही ते शेवटच्या श्वासापर्यंत समाजकारणात सक्रिय राहिले. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि साहित्य वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT