कंधार : एका पित्याने पोटच्या ८ महिन्याच्या व ८ वर्षाच्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कंधार शहरात उघडकीस आली आहे.
याप्रकरणी आरोपीच्या पत्नीने रविवारी (दि.७) रात्री अडीच वाजता दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध कंधार पोलिसांत गु.र.न.२०४/२४ कलम ३७६,२७६ एफ भादवी सह कलम ५,६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. प्रविण आगलावे हे करीत आहेत.