Farmers demand compensation through Panchnama
नांदेड, पुढारी वृत्तसेवा: पडलेल्या पावसाच्या आकडेवारीवरून नांदेड जिल्ह्यात अद्याप मान्सूनचे आगमन झाले नाही. बडीचाचा किंवा मान्सूनपूर्व जो पाऊस झाला त्या आधारे पेरण्या झालेले बियाणे जळून जात आहेत. शंभर मिलीमिटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नयेत, असे आवाहन प्रशासन सारंवार करीत असल्याने बहुतांश पेरण्या रखडल्या आहेत.
उन्हाळ्याच्या मध्यापासून पावसाबद्दल अंदाज व्यक्त करण्यास सुरुवात होते. त्यानुसार यावर्षी सरा सरीपेक्षी अधित्रा व नियमित पाऊस असल्याचे अंदाज विविध स्तरावरून व्यता झाले. परंतु, वास्तव मात्र उलट आहे. गेल्या काही दिवसापासून आकाशात दररोज वग वाटून येत आहे. पण, पाऊस पडत नाही.
कोल्ह्यावर स्वार होऊन सूर्य नारायणाने दि. ८ जून रोजी मृग नक्षत्रात प्रवेश केला. त्याला आठवडा लोटला. पण, मराठवाड्याच्या बहुतांता भागाठ किरकोळ पाऊस वगळता पावसाने दडी मारली आहे. मान्सूनपूर्व पाऊस मे महिन्याच्या दुसन्या पंचरवाल्यात जोरदार बरसला. वा पावसाने जलाशयात किरकोळ वाढ झाली, ख्वाय तो फायदा या तुलनेत वादळी वारे व विजांनी प्रचंड नुक्सान झाले. जिवीत हानी व घरांची पडझड झाली.
अनेक वालुक्यात उत्साहाने उभारलेल्या सोलार यंत्रणा कोसवइन पडल्या, आंबा पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भाजी-पाला उत्पादकांना फटका बसला. जूनमध्ये मात्र गेल्या पंधरा दिवसात मागच्या आतवत्यातील बुधवार वगळता पाऊस रसला आहे. गेल्या बुधवारी पावसापेक्षा वादळी वाऱ्याने प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकयांचे आतोनात नुकसान झाले.
आता ग्रामीण जनतेला व शेतकऱ्यांना आगाडी वारीचे वेध लागले आहे. देहू व आळंदी येथून बारीत सहभागी होणारे भाविक मागच्याच आठवड्यात स्वाना झाले आहेत. जिल्ह्याच्या विविध भागातून निषणाया विंड्या हळूहळू मार्गस्थ होऊ लागल्या आहेत परंतु, त्यांचे अर्षे लक्ष बाळया आईकडे लागले आहे.
मृगाचा पहिला आठवडा उलटला तरी पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार तसेच सेती तन्हांच्या सल्ल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची पाई करू नये, असे आवाहन प्रशासन करत आहे त्यामुळे विल्ह्याच्या बहतांश पेरणीयोग्य क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या आहेत. पण, ज्या शेतक-यांनी पेरणी केली ती वाया गेल्यात जमा आहे.
आजवर झालेल्या किरकोळ पावसाने जमिनीतील उष्णता बाहेर पडत असून, भयंकर उकाडयाने लोक हैराण झाले आहेत. शिनास पेरणी झालेले बियाणे जमिनीतच करपून जात आहे. पेरणी वाचविण्यासाठी शेतकरी आटोकाट प्रयत्न करत आहेत. जून अर्था संपला तरी विजेचा वापर कमी झालेला नाही.