हदगाव : हदगाव तालुक्यातील हदगाव पंचायत समिती विभागातील विस्तार अधिकारी (कृषी) बालासाहेब सुर्यवंशी यांच्या कडे अतिरिक्त पदभार डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेचा व विशेष घटक योजना असून त्यांचा दर्जा गट (क) असून बऱ्याच वर्षा पासून वादग्रस्त असलेले विस्तार अधिकारी यांनी विशेष घटक योजनेतील लाभार्थी यांना आर्थिक तडजोड न केल्यामुळे त्यांची बिले काढली नाहीत तर काहींचे काम करून ही आर्थिक तडजोड केल्याशिवाय कामे केली नाहीत तेव्हा मनाठा येथील एका शेतकऱ्याला आर्थिक मागणी करत तब्बल 20 हजार रुपयाची मागणी केली. त्या दरम्यान नांदेड येथील नंदी हॉटेल या ठिकाणी पैसे घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांनी सापळा रचून रंगेहाथ पकडण्यात आल्याची घटना दि.1 ऑक्टोंबर रोजी दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान घडली. या घटनेने हदगाव पंचायत समितीच्या भ्रष्टाचारी कर्मचारी अधिकारी यांच्या मध्ये खळबळ उडाली आहे.
हदगाव तालुक्यातील पंचायत समिती विभागातील कृषी विस्तार अधिकारी अतिरिक्त पदभार असलेले बालासाहेब पुंडलिकराव सुर्यवंशी यांनी तालुक्यातील विशेष घटक योजनेतील लाभार्थी यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक केली असून गट विकास अधिकारी कैलास बळवंत यांना दूरध्वनी वरून तक्रार करून ही काही फरक पडला नाही तर या विशेष घटक योजनेतील तालुक्यातील सर्वच लाभार्थी यांना आर्थिक मागणी करत त्यांना त्रास देण्याचं काम विस्तार अधिकारी बालासाहेब सुर्यवंशी यांनी केलं तर आदिवासी दुर्गम भागातील व तामसा परिसरातील सर्वच लाभार्थी यांना नाहक पैश्याची मागणी करत त्यांना तुमची बिले निघत नाहीत आम्हाला वरिष्ठ यांच्या कडे पैसे द्यावी लागतात पैसे नाही दिले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वालबन योजनेच्या लाभार्थी यांना तर विहिरीचे कामे पूर्ण होऊन ही बिले काढली नाहीत तसे मनाठा येथील एका लाभार्थी यांना तुम्हास डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजनेतून विहीर मजूर झाली आहे.
तुषार ठिबक,सिंचन पाईप ,इत्यादी साठी पैसे द्यावे लागतात आम्हाला नांदेड येथील जिल्हा परिषद च्या समाजकल्याण विभागातील अधिकारी यांना पैसे द्यावे लागतात मी एकटा नाही पैसे जमा करून आम्हाला द्यावे लागतात तेव्हा तक्रारदार यांना दि.30 सप्टेंबर रोजी तब्बल 20 हजार रुपयाची मागणी केली तेव्हा तक्रारदार यांना मान्य नसल्याने नांदेड येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांना संपर्क साधून आपली तक्रार दिली तक्रारीची शहानिशा करत दिनांक 1 ऑक्टोंबर रोजी नांदेड येथील चैतन्यनगर नंदी हॉटेल मध्ये पंच समक्ष सापळा रचून विस्तार अधिकारी कृषी बालासाहेब सुर्यवंशी यांना रोख 20 हजार रुपये लाच स्वीकारताना दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान पकडण्यात यश आले.
यामध्ये तक्रारदार यांच्या तक्रारीवरून फिर्यादी वरुन पोलीस अधिकारी राहुल तरकसे पोलीस उपअधीक्षक नांदेड लाचलुचपत विभाग यांच्या फिर्यादी वरून विमानतळ पोलीस स्टेशन या ठिकाणी कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस बालासाहेब सुर्यवंशी यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या जवळील रोख रक्कम 2600 मोबाईल, आधार कार्ड, पैन कार्ड जप्त करण्यात आले आहे. तर आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असून या ठिकाणी कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती हदगाव बालासाहेब सुर्यवंशी यांच्या संपत्तीची चौकशी करून ती संपत्ती जप्त करण्यात यावी अशी मागणी हदगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव व लाभार्थी कडून होत आहे, या ठिकाणी प्रेवेक्षन अधिकारी प्रशांत पवार होते तर पुढील तपास रसूल तांबोळी हे करीत आहेत या घटनेने पूरग्रस्त शेतकऱ्यांतून असल्या भ्रष्ट अधिकाऱ्याला धडा शिकवल्या तक्रारदार यांचे कौतुक होत आहे.