Crime pudhari
नांदेड

Illegal Sand Mining : डीआयजी पथकाचा छापा; 1 कोटी 36 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अवैध वाळू उपसा करणाऱ्या 9 जणांवर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : 1 मे पासून पोलीस उपमहानिरीक्षकांच्या (डीआयजी) विशेष पथकाने जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात धडक मोहीम उघडून वाळू माफियांचे धाबे दणाणून सोडले आहेत. या कारवाईच्या 17 व्या दिवशी पथकाने लिंबगाव येथील वाळू घाटावर मध्यरात्री छापा टाकत अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या 9 जणांवर धडक कारवाई केली.

या धडक कारवाईत पथकाने वाळू उपशासाठी वापरले जाणारे दोन हायवा, एक टिप्पर, जेसीबी मशीन, इंजिन बोट, फायबर बोट, दहा तराफे आणि 50 ब्रास वाळू असा एकूण 1 कोटी 36 लाख 10 हजार रुपयांचा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे.

दरम्यान, “आपल्या परिसरात कुठेही अवैध व्यवसाय सुरू असल्यास नागरिकांनी त्याची माहिती 9150100100 या मोबाईल क्रमांकावर थेट द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल,“ असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT