गोकुंदा येथे भरदिवसा घरफोडी; साडेतीन लाखांचा ऐवज लंपास 
नांदेड

Nanded house robbery : गोकुंदा येथे भरदिवसा घरफोडी; साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

किनवट : किनवट शहरापासून अवघ्या दीड कि.मी.अंतरावरील गोकुंदा येथील एकविरानगर भागात भरदिवसा घरफोडीची घटना उघडकीस आली. ही घटना गुरूवारी (दि.२१) दुपारीच्या सुमारास घडली. यामध्ये सुमारे ३ लाख ४१ हजाराचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.

फिर्यादी सय्यद सयफोदीन सय्यद सरफोदीन (वय २८, रा. एकविरानगर गोकुंदा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता ते घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. दुपारी साधारण साडेबारा वाजता परत आल्यावर घराचे दार तोडलेले दिसले. घरात शिरून पाहिले असता अज्ञात चोरट्यांनी सोन्याची अंगठी (वजन २ ग्रॅम, किंमत १२ हजार ४३० रूपये), सोन्याचा हार (वजन ३० ग्रॅम, किंमत १ लाख ५१ हजार ८१६ रुपये) तसेच इतर सोन्याचे दागिने (किंमत १ लाख ७७ हजार ३६० रुपये) असा एकूण ३ लाख ४१ हजार ६०६ रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे स्पष्ट झाले.घटनेची माहिती मिळताच किनवटचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे, पोलीस निरीक्षक देवीदास चोपडे व पोलीस उपनिरीक्षक देवानंद फडेवार यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देवानंद फडेवार करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT