Gas Price Hike : गॅस दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन file photo
नांदेड

Gas Price Hike : गॅस दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन

केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या गॅस सिलिंडरच्या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने गुरुवारी आंदोलन पुकारले.

पुढारी वृत्तसेवा

Congress Protest Against Gas Price Hike

नांदेड, पुढारी वृत्तसेवा सरकारने घरगुती व व्यावसायिक सिलिंडरची केलेली दरवाढ तत्काळ रद्द करावी या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी (दि. १२) आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या गॅस सिलिंडरच्या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने गुरुवारी आंदोलन पुकारले. जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती वाढल्या तरी त्याचा बोजा सामान्य जनतेवर पडू दिला नाही, सबसीडी देऊन जनतेला महागाईचे चटके बसू दिले नाहीत. युपीए सरकारच्या काळात घरगुती सिलिंडर ४०० रुपयांना मिळत होते, जाता एका सिलिंडरसाठी ९०० रुपयांपेक्षा जास्त मोजावे लागत आहेत, सिलिंडर बुक करण्याचा कालावधीही १५ दिवसांवरून एक महिन्याचा करण्यात आला आहे, यामुळे मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीही १९०० रुपयावर गेल्या असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

ही दरवाढ तत्काळ रद्द करावी अन्यथा काँग्रेस पक्षाच्यावतीने हे आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या आंदोलनात डॉ. श्रावण रॅपनवाड, महेश देशमुख, बालाजी चव्हाण, कुमार कुर्तडीकर, दीपक हुजुरीया, आनंद चव्हाण, संजय वाघमारे, आनंद गुंडले, विठ्ठल पावडे, गणेश ढगे, सुरेश हाटकर, केदार पाटील, प्रतापराव देशमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT