आजपासून बारावीची परीक्षा; जिल्ह्यात ११० केंद्रांवर ४२,८७२ विद्यार्थी File Photo
नांदेड

आजपासून बारावीची परीक्षा; जिल्ह्यात ११० केंद्रांवर ४२,८७२ विद्यार्थी

बारावीची परीक्षा आज मंगळवार (दि. १०) तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.

पुढारी वृत्तसेवा

Class 12th exams from today; 42,872 students at 110 centers in the district

नांदेड, पुढारी वृत्तसेवा: नांदेड जिल्ह्यात दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात होण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले. बारावीची परीक्षा आज मंगळवार (दि. १०) तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यावर्षी जिल्ह्यातून बारावीसाठी ११० केंद्रांवर ४२,८७२, दहावीसाठी १७७ केंद्रांवर ४९,२०१ विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे.

परीक्षेत कॉपी रोखण्यासह, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष दक्षता समितीची स्थापना केली असून, बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. जिल्ह्यातील परिक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. उपद्रवी, संवेदनशील केंद्रांवर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले असून, तिथे केंद्रप्रमुख, पर्यवेक्षकांची अदलाबदलीचे आदेश राज्य मंडळाने दिले. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी सूचना दिल्या.

परीक्षा काळात वीज पुरवठ्याची समस्या उद्भवू नये. यासाठी महावितरणला सतर्क राहण्यास सांगितले. परीक्षा केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त असणारं असून महसूल विभागाची विशेष भरारी पथकेही कार्यरत राहतील. पं. स. स्तरावरील वर्ग एक, वर्ग-दोनच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती या पथकांत करण्यात येणार आहे, असे शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील नांदेड, देगलूर, बिलोली, नायगाव, मुदखेड, मुखेड, किनवट, हदगाव, अर्धापूर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर, माहूर, कंधार, लोहा असे सोळा तालुक्यांत ही परीक्षा होत आहेत. स्वतंत्र यंत्रणा कामाला लागली आहे. परीक्षा केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कॉपी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून, कॉपी करणाऱ्यांना मदत करणाऱ्यांवर देखील कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही गैरप्रकार आढळल्यास तातडीने कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले.

जिल्हास्तरावरी पथकांची राहणार करडी नजर

१२ वी साठी ११० बैठे, परिरक्षक २०, विशेष भरारी १०, प्रति तालुका स्तरावरील भरारी २, उपविभागीय स्तरावरील १ पथक स्थापन करण्यात आले आहे. याशिवाय जिल्हास्तरावर दोन पथके नियुक्त केले असून यात जिल्हाधिकारी, जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी, डायटचे प्राचार्य, पोलिस अधीक्षक, उपशिक्षणाधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचा यात समावेश करण्यात आलेला आहे. या पथकांची परीक्षा केंद्रावर करडी नजर राहणार आहे.

संपर्कासाठी हेल्पलाइन

विद्यार्थ्यांना अभ्यास व परीक्षेसंदर्भात काही अडचणी, समस्या निर्माण झाल्यास योग्य मार्गदर्शन मिळावे आणि तणावमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी, या उद्देशाने विभागीय मंडळ स्तरावर तज्ज्ञ समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. यासाठी इयत्ता १० वी साठी ०२३८२-२५१६३३ व इ. १२ वीसाठी ०२३८२-२५१७३३ या हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT