Nanded Crime News : बिलोलीत 'अंदर-बाहर' जुगार अड्ड्यावर छापा

दोन कारसह १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, ७ जणांवर कारवाई
 gambling den raid
जुगार अड्ड्यावर छापा File Photo
Published on
Updated on

Raid on 'Andhar Bahar' gambling den in Biloli

बिलोली, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी अवैध धंद्यांविरुद्ध पुकारलेल्या मोहिमेतंर्गत बिलोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शहरातील लोहार गल्ली भागात सुरू असलेल्या अंदर-बाहर जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी ७ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून दोन कारसह एकूण १७ लाख २५ हजार ०५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 gambling den raid
MP Ravindra Chavan : पक्ष बदलाच्या अफवांमुळे मी डगमगणार नाही

७ फेब्रुवारी रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास बिलोली येथील लोहार गल्लीत काही इसम जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तातडीने छापा टाकला.

इलियास पाशा शेख ३०, रा. निजामाबाद सुदाम पोशेट्टी मिरले ४०, रा. रंजल, जि. निजामाबाद, मोहम्मद युनुस मोहम्मद रसुल ५५, रा. निजामाबाद मोहम्मद इब्राहिम खान ५८, रा. निजामाबाद धनगरी मुथी रामलु ५७, रा. निजामाबाद, खैरान सोहेल नवाबसाब ५२, रा. बोधन राकेश गंगाराम गोगरोड (२६, रा. बिलोली) यावेळी सात जण रंगेहाथ जुगार खेळताना आढळले.

 gambling den raid
Nanded News : गोमांस विक्री करणाऱ्या १२ जणांवर पोलिसांची कारवाई

या कारवाईत पोलिसांनी धुंदाई कार४५७५८१ इंडिका विस्टा कार१६८०७८ किंमत मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, सुरज गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी शाम पानेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक के. व्ही. शिंदे व त्यांच्या पथकाने केली आहे. या यशस्वी कारवाईबद्दल पोलिस अधीक्षकांनी बिलोली पोलिस पथकाचे कौतुक केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news