तुम्ही बळ द्या, 'लाडकी बहीण'चे अनुदान दुप्पट करु : मुख्यमंत्री शिंदे pudhari photo
नांदेड

तुम्ही बळ द्या, 'लाडकी बहीण'चे अनुदान दुप्पट करु : मुख्यमंत्री शिंदे

तुम्ही बळ द्या, 'लाडकी बहीण'चे अनुदान दुप्पट करु : मुख्यमंत्री शिंदे, महायुतीच्या प्रचाराचा 'श्रीगणेशा'

पुढारी वृत्तसेवा

नांदेड, पुढारी वृत्तसेवा: सावत्र भावांनी कितीही खोडा घातला तरी लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, उलट आचारसंहितेची अडचण नको म्हणून पुढच्या महिन्याचे पैसे अॅडव्हान्स टाकले. येणाऱ्या निवडणुकीत महायुतीला पुन्हा बहुमताने निवडून द्या, दीड हजार रपयांची ही योजना दोन, अडीच, तीन हजार अशा प्रकारे वाढवत नेऊ, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी दिले. रविवारी (दि. १३) पेसील नवा मोंढा मैदानावर महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, माजी खा. हेमंत पाटील, प्रताप पाटील चिखलीकर, आ. बालाजी कल्याणकर, राजेश पवार, भीमराव केराम, श्यामसुंदर शिद, डॉ. तुषार राठोड, माजी आ. अमर राजुरकर, दिलीप कंदकुर्ते, संतुकराम संबडे, श्रीजया काण, राजश्री पाटील, पुरण फार यांची उपस्थिती होती.

आता केव्हाही निवडणूक जाहीर होऊ शकते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांची आजची सभा महायुतीच्या प्रचाराचा एकप्रकारे श्रीगणेशा होता. आपल्या २० मिनिटांच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी महायुतीने केलेल्या कामांचा पाढा वाचतानाच विरोधकांवर टीकेची झोड उठवली. लाडकी बहीण योजना खूप विचारांती सुरु केली आहे. परंतु, या योजनेला मिळणारे यश पाहुन सावत्र भाऊरुपी विरोधकांनी अपप्रचार केला, गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

अगोदर म्हटले ही योजना फसवी आहे, सरकार दिशाभूल करतेय, हा चुनावी जुमता आहे. नंतर म्हणाले की, खात्यात पडलेले पैसे काढून घ्या अनाचा सरकार काढून घेईल. पण लाडक्या बहिणींनी विरोधकांना भीक घातली नाही. नंतर त्यांनी आवई उठवली की, आचारसंहिता लागताच योजना बंद पडेल पण, आम्ही नोव्हेंबरचे पैसेही आगाऊ पैसे स्वरुपात बहिणींच्या खात्यावर जमा केले आहेत, ही योजना कधीही बंद पडणार नाही, किंबहुना महायुती सरकारने सुरु केलेली कोणतीही योजना बंद पडणार नाही, असा विश्वास श्री. शिंदे यांनी यावेळी दिला.

आमचे सरकार देणारे आहे. नियत साफ असल्यानाच आम्ही ही योजना सुरु केली. सुशिक्षित बेरोजगारांसाठीही नवीन योजना सुरु केली आहे. प्रशिक्षण देऊन वरून भत्ता देणारे हे सरकार आहे. ठेकेदारांकडून अॅडव्हान्स घेणारे हे सरकार नाही. जनतेचा आशीर्वाद कायम राहिल्यास बहिण योजनेचे मानधन तर वाढवूच परंतु, यापेक्षा अधिक लोकाभिमुख निर्णय घेण्यात येतील. लाडकी बहिण योजनेच्या विरोधात विरोधक न्यायालयात गेले, परंतु, न्यायालयाने त्यांना परत पाठवले. आता नागपूरच्या न्यायालयात गेले आहेत. महाआघाडीच्या सरकारमध्ये गृहमंत्रीही जेलमध्ये गेले, त्यांच्या भूलथापांना जनता बळी पडणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आमचे सरकार जनसामान्यांचे आहे, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना आमच्या योजना कळणार नाहीत. एस.टी तोट्यात होती, ही आम्ही फायद्यात आणली. महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीत प्रवासाची योजना त्यासाठी कारणीभूत ठरली. तीर्थदर्शन योजना एस. टी. साठीही पुरक ठरली. आमचे सरकार दुरदृष्टीचे आहे. जनतेने बळ दिल्यास लाडकी बहिण योजनेचे अनुदान तीन हजारापर्यंत वाढवण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला. महाआघाडी सरकार विकासकामे बंद पाडणारे होते, आमचे सरकार विकासाचे नवनये प्रकल्प सुरु करुन पुर्णत्वास नेणारे सरकार आहे, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी कोणतीही योजना बंद पडणार नाही, पडू देणार नाही, असे आश्वासन दिले. 'शासन अपल्या दारी' या योजनेचा सुमारे ५ राजकोटी लोकांनी लाभ घेतला तर आता लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील २ कोटी २० लाख भगिनींना होत असल्याचे त्यांनी आवर्जुन नमूद केले.

सुरक्षित बहीण

लाडकी बहीण योजना ज्या प्रकारे यशस्वीरित्या राबवली, त्याचप्रमाणे बहिणीच्या सुरक्षेची जबाबदारीही आमची आहे. बहिणीना त्रास देणाऱ्यांना सोडणार नाही तर फासावर लटकवले जाईल, असे सांगताना त्यांनी बदलापूर एन्काऊंटरचे समर्थन केले आणि उपस्थितांकडूनही ती कृती योग्य असल्याचे वदवून घेतले.

आशा भोसले यांचे आभार

प्रख्यात गायिका आशा भोसले यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेबद्दल सरकार व मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. दीड हजार रुपयांची काय किमत असते त्यांनी स्वानुभवाने सांगितले. त्याचा पुनरुच्चार करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशाताईचे आभार मानले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT