'Chhawa Style' Ganesh idol is the attraction this year!
नांदेड, पुढारी वृत्तसेवा
ऑगस्ट अखेरीस गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. पारंपरिक आकर्षणाच्या श्री मूर्तीबरोबरच गेले वर्षभर गाजलेल्या छाया या चित्रपटाचा प्रभाव मूर्ती निर्मितीवर झाला आहे. छावा स्टाईल मूर्ती चंदा बाजारात दिसतील. स्थानिक स्वराज्य संस्थांची पृष्ठभूमी या उत्सवाला असल्याने उत्साहाला पारावार नसेल. त्यामुळे यंदा गणेशोत्सवात धूम अनुभवता येणार आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विघटित होत नाहीत. त्यामुळे जल प्रदूषण होते, असा आक्षेप घेत काही लोक न्यायालयात गेले होते. खरे म्हणने हा वाद २०११ पासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सुमारे ३ महिन्यांपूर्वी न्यायालयाने प्लास्टरच्या मूर्तीबर चंदी घातली होती. याचाबत मूर्तिकारांच्या संघटनेने आवाज उठवला होता. स्थावर सुनावणी होऊन न्यायालयाने अगदी अलीकडे मूतीवरील बंदी उठवली आहे. परंतु आता वेळ कमी असल्याने पारंपरिक पद्धतीच्याच मूर्ती तयार केल्या जात आहेत. त्यातही मागणीच्या तुलनेत पुरवठा होऊ शकणार नसल्याने भाववाद अटळ असल्याचे सांगण्यात आले.
भाववाढ होणारच आहे. कारण मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे भाव बाढले आहेत. प्लास्टर ऑफ पॅरीस प्रतवारीनुसार ९ ते १२ हजार रुपये टन, रंग १५०० ते २० हजार रुपये प्रति २० लिटर, हजार ते १२०० रुपये मालामागे सरासरी १० टक्के भाववाढ झाली आहे. त्याचाही मूर्तीच्या दरावर परिणाम अपेक्षित आहे. शिवाय कामगारांची टंचाई आहे. ते सुद्धा मजुरी वाढवून मागत आहेत. कारखान्यासाठी जागा उपलब्ध नाही. विश्वकर्मा, मुद्रा यासारख्या योजना आहेत. परंतु त्यातून या व्यवसायाला वाश्रय मिळत नाही. लघु उद्योगासाठीही कर्ज मिळत नसल्याच्या मूर्तिकारांच्या तक्रारी आहेत.
नांदेड जिल्ह्यात मोठे कारखाने सुमारे २५० आहेत. तर तेवढीच संख्या घरगुती स्तरावर मृत्यां तयार करणाऱ्यांची आहे. नदिडमध्ये ७० टक्के मूर्ती या स्थानिक स्तरावर तयार केलेल्या विक्री होतात. तर ३० टक्के मूर्ती हैदराबाद, पेण, हमरापूर या भागातून येतात. नदिडमध्ये एक ते १५ फूट उंचीच्या श्री मूर्ती तयार केल्या जातात. यंदा मूर्ती किती उंच असावी, यावर अद्याप कोणतेही बंधन नाही. ठराविक मंडळांमध्ये उंच मूर्ती बसवण्यावाचत स्पर्धा असते. दरम्यान, या व्यवसायाला राजाश्रय मिळावा, अशी मागणी मूर्तिकारांची असून त्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुद्धा सुरू आहे.
पूर्वी मूर्ती तयार करतानाच त्याला टोप, उपरणे, सोवळे, दागिने केले जात असत. नंतर त्याची रंगरंगोटी केली जात असे. परंतु आता भाविकांतून मूती पवित्र भासली पाहिजे, असा आग्रह आहे. त्यासाठी मूर्ती तयार केल्यानंतर खऱ्या पद्धतीने टोप, कर्णकुंडले, उपरणे, सोवळे, कडे, आदी साज घालून मूर्ती सजविण्यात येत आहेत. तुलनेने ही पद्धती नाजूक व क्लिष्ट आहे.
भारत-पाकिस्तान युद्ध नकतेच झाले. त्याचा प्रभाव मूतींवर पडला असता परंतु मूर्तिकारांना त्यासाठी वेळ मिळाला नाही. परंतु मोठे मंडळ जे देखावे तयार करतात, त्यावर मात्र युद्धाचा निश्चित प्रभाव असेल. गणेशोत्सवापेक्षा नवरात्रौत्सवात हे वारे अधिक दिसून येईल, असे गजेंद्रसिंह ठाकूर यांनी सांगितले.
दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा महादेव आसन, अयोध्या राम आसन, विठ्ठल स्वरूप, चौरंगासन, दगडूशेठ हलवाई स्वरुप या पद्धतीबरोबरच छावा स्टाईल मूर्ती बंदाचे प्रमुख आकर्षण असेल. छत्रपती संभाजी राजांवर गतवर्षी छावा चित्रपट निघाला. तो प्रचंड गाजला. त्यातील महाराजांच्या आसनशैलीमध्ये मूती यंदा पहायला मिळतील, असे प्रसिद्ध मूर्तिकार गजेंद्रसिंह ठाकूर यांनी सांगितले.