Nanded Political News : ऋणानुबंधाच्या गाठी... केवळ भोकर अन् देगलूरसाठी ! File Photo
नांदेड

Nanded Political News : ऋणानुबंधाच्या गाठी... केवळ भोकर अन् देगलूरसाठी !

चव्हाण-गोपछडेंचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र; पण निधी दोन मतदारसंघांनाच

पुढारी वृत्तसेवा

Chavan and Gopchade's operational area is Maharashtra, yet funds are allocated to only two constituencies

संजीव कुळकर्णी

नांदेड : महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेल्या अनेक नेत्यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सार्वजनिक कामांना हातभार लावला; पण भाजपाच्या अशोक चव्हाण आणि डॉ. अजित गोपछडे यांनी मात्र आतापर्यंतच्या कार्यकाळात भोकर आणि देगलूर या विधानसभा मतदारसंघांशी असलेला आपला ऋणानुबंध जपला आहे.

बारड येथील काँग्रेस कार्यकर्ते संदीपकुमार बालासाहेब देशमुख यांनी नांदेडमध्ये वास्तव्यास असलेल्या भाजपाच्या वरील दोन खासदारांच्या स्थानिक विकास निधीचा लेखाजोखा तसेच त्यांनी आपल्या निधीतून प्रस्तावित केलेल्या कामांचा तपशील माहितीचा अधिकार अधिनियमाअंतर्गत जिल्हा नियोजन समितीकडून नुकताच मिळविला. ३१ जुलै २०२६ अखेरच्या अहवालानुसार या दोन्ही खासदारांनी केवळ मोक्कर आणि देगलूर या दोन मतदारसंघांमध्येच जास्तीत जास्त निधी खर्च केला.

या दोन्ही खासदारांनी आपल्या स्थानिक विकास निधीच्या समन्वय नियंत्रण आणि वितरणाची जबाबदारी नदिड जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ आणि २०२५-२६मध्ये दोन्ही खासदारांना प्रत्येकी ५ कोटी रूपये उपलब्ध झाले. खा. चव्हाण यांनी २४-२५ वर्षातील निधी वितरणाची सुरुवात मुखेड तालुक्यातील गोपाळचावडी येथील दोन कामांपासून सुरू केली. रस्ता आणि नाली बांधकामासाठी त्यांनी प्रत्येकी १० लाख रूपये दिले; पण वरील वर्षात त्यांनी भोकर विधानसभा मतदारसंघामध्येच तब्बल २८ कामांना निधी दिला.

चव्हाण यांनी आपल्या पारंपरिक मतदारसंघाला आणि त्या भागातील कार्यकर्त्यांना जपताना बहुसंख्य ठिकाणी रस्ते-नाल्या या कामांचीच शिफारस केली. धामदरी व मेंढ़ला (ता. अर्धापूर) आणि कोल्हा (ता. मुदखेड) येथे ग्रामपंचायतींच्या उद्यानात 'जीम साहित्य' बसविण्यासाठी त्यांनी प्रत्येकी ७ लाख रूपये प्रस्तावित केले. तसेच त्यांच्या औदार्यामुळे अर्धापूर तालुक्यात निजामपूरवाडी येथे जि.प.च्या प्राथमिक शाळेत दोन वर्गखोल्या बाधण्यासाठी २६ लाखांचा निधी उपलब्दा झाला; पण या कामांची प्रगती कागदपत्रांतून स्पष्ट झालेली नाही.

२०२५-२६ सालामध्ये खा. चव्हाण यांनी भोकर तालुक्यात मोखंडी तांडा येथे रस्त्याच्या कामासाठी १० लाख आणि नांदेडच्या तरोडा (खु.) भागात रस्त्याव्याच एका कामासाठी २५ लाख रूपये समितीकडील नोंदीतून स्पष्ट झाले आहे. भाजपा खासदार झाल्यानंतर मागील अडीच वर्षात खा. चव्हाण यांनी नांदेड मनपा क्षेत्रामध्ये केवळ वरील एका कामासाठीच निधी उपलब्ध करून दिला. डॉ. गोपछडे यांनी खासदार झाल्या-

लक्षवेधी आल्या २०२४-२५ व्या वर्षात आपल्या बोरगाव (ता. बिलोली) या गावातील महादेव मंदिराच्या बाजूला सभागृह बांधकामासाठी ५० लाखांचा निधी देऊन आपल्या स्थानिक विकास निधीच्या खर्चास सुरुवात केली. वरील सबंध वर्षात मुखेड तालुक्यातील उमरदरी आणि नायगाव गाये वगळता त्यांनी बिलोली व देगलूर तालुक्यात वेगवेगळ्या प्रकारच्या २२ कार्मासाठी निधी दिला.

बाच वर्षात त्यांनी कोल्हे बोरगाव या गावात ३० लाख रूपये खर्चुन एलइडी दिव्यांचा 'प्रकाश' पाडल्याचे दिसून येते. गोपछले यांनी २०२५-२६ वर्षातील बहुसंख्य काने वरील दोन तालुक्यांमध्येच प्रस्तावित केली. भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे यांच्या विष्णुपुरी भागातील शिक्षण संस्थेकडे जाणाऱ्या एका रस्त्यासाठी त्यांनी २० लाख रूपये दिले; पण नांदेड शहरात वास्तव्यास असलेल्या गोपछडे यांनी मनपा क्षेत्रातील एकाही कामासाठी निधी प्रस्तावित केला नाही. त्यांचे वास्तव्य डॉक्टर्स लेनमधील ज्या मुख्य रस्त्यावर आहे, त्या रस्त्याची दुर्दशा दररोज दृष्टीस पडत असतानाही गोपछडे यांनी शहरामध्ये अद्याप निधी दिलेला नाही, याकडे संदीपकुमार देशमुख यांनी लक्ष वेधले आहे.

ते चव्हाण आणि हे चव्हाण

शंकरराव चव्हाण १९७७ साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा ते विधानसमेत भोकर मतदारसंघाचेच प्रतिनिधित्व करत होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर दिलेल्या पहिल्याच मुलाखतीत त्यांनी 'मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो आहे, मराठवाडयाच्या सीमेत मला बांधून घेता येणार नाही.' असे निःसंदिग्धपणे सांगितले होते. त्यांच्या पश्चात अशोक चव्हाण यांनाही काँग्रेसने दोनदा मुख्यमंत्री केले, नंतर प्रदेशाध्यक्ष केले, तरी कसोटीच्या काळात त्यांनी पक्ष सोडून भाजपात प्रवेश केला. या पक्षाने त्यांना राज्यसभेवर घेऊन त्यांचे कार्यक्षेत्र व्यापक केले, तरी या धाकट्या चव्हाणांनी स्वतःला भोकरच्या सीमेतव जखडून घेतले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT