Police FIR File Photo
नांदेड

Urdu School Controversy | उमरखेड येथे उर्दू शाळेत आक्षेपार्ह गाणे वाजवल्याप्रकरणी मुख्याध्यापक, शिक्षकांवर गुन्हा

Nanded Umarkhed School | नगरसेवक गोपाल कलाणे यांची तक्रार

पुढारी वृत्तसेवा

Umarkhed Urdu School News

उमरखेड : शहरातील अब्दुल गफूर शहा नगर पालिका उर्दू शाळा क्र. 02 येथे आक्षेपार्ह व धार्मिक भावना भडकविणारे गाणे वाजविण्यात आल्याच्या आरोपावरून उमरखेड पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक व एका शिक्षकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 196(1)(c) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नगरसेवक गोपाल कलाणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 31 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता ते घरी जात असताना शाळेच्या परिसरात मोठ्या आवाजात गाणे वाजवले जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. संबंधित गाण्यात धार्मिक संदर्भासह आक्षेपार्ह शब्दांचा उल्लेख असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच काही विद्यार्थ्यांनी हातात प्रतीकात्मक तलवारी घेऊन सादरीकरण केल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

या प्रकारामुळे इतर धर्मीयांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात तसेच समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक अन्सार उल्लाखान, अब्दुल मन्नान खान (वय 55) आणि शिक्षक मोहम्मद फिरोज आशाजी (वय 54) यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.

तपासानंतर उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 0083/2026 नोंदविण्यात आला असून, 12 फेब्रुवारी 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची वेळ 26 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता असल्याचे नोंदविण्यात आले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक सागर इंगळे यांच्याकडे सोपविण्यात आला असून तपास सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT