नांदेड  
नांदेड

Nanded | मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरुद्ध बिनबुडाचे आरोप!

BJP workers file complaint against MLA Pawar- भाजप कार्यकर्ते आक्रमक; आ. पवार यांच्याविरुद्ध तक्रार

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध कोणताही ठोस आधार अथवा पुरावा नसताना खोटे व बदनामीकारक आरोप करून त्यांची सार्वजनिक प्रतिमा व प्रतिष्ठा मलिन करण्याचा प्रयत्न करणारे आमदार रोहित पवार यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भाजपच्या एका शिष्टमंडळाने केली असून इतवारा पोलिस ठाण्यात पवार यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आमदार रोहित राजेंद्र पवार यांनी 16 नोव्हेंबर रोजी यशवंतराव वव्हाण सभागृह, नरिमन पॉईंट, मुंबई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केल्यानंतर नांदेड भाजपाने तीव्र आक्षेप घेत कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. माजी विरोधी पक्षनेता महेश खोमणे यांनी याबाबत पोलिस निरिक्षकांना तक्रार अर्ज दाखल केला असून यावेळी महापौर सौ. कविता संतोष मुळे यांचीही उपस्थिती होती.

खोमणे यांनी तक्रार अर्जात नमुद केले की, स्व. अजित पवार यांच्या विमान अपघातामागे घातपात असल्याचा आरोप आ. पवार यांनी केला आहे, या प्रकरणाशी 'व्ही. के. सिंग व व्हीएसआर' विमान कंपनीला फडणवीस यांनीच पाठीशी घातल्याचा गंभीर आरोप पवार यांनी केला आहे.

फडणवीस यांच्यावर आरोप करताना पवार यांननी कोणताही ठोस पुरावा, अधिकृत निष्कर्ष अथवा विश्वसनीय आधार असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलेले नाही. केवळ राजकीय हेतूने, वैयक्तिक राजकीय स्वाार्पोटी अशा प्रकारची वक्तव्ये करणे हे संबंधित व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणारे असल्याचे अर्जात नमुद करण्यात आले आहे.

त्यामुळे रोहित राजेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेल्या वक्तव्यांची सत्यता, त्यामागील पुरावे, वक्तव्यांचा उद्देश तसेच सदर वक्तव्ये प्रसारित करण्यामागील परिस्थिती यांची योग्य ती चौकशी होणे आवश्यक आहे. आ. रोहित राजेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरुद्ध केलेल्या बदनामीकारक वक्तव्यांची दखल घेण्यात यावी आणि चौकशी अंती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी या अर्जात करण्यात आली आहे. यावेळी विजय येवनकर, शितल खांडिल, उमेश चव्हाण, उदय देशमुख, वैजनाथ देशमुख, अनिल हजारी, संतोष मुळे, सुभाष पाटील, सुमित मुथा, संदिप सोनकांबळे, अमित वाघ आदींची उपस्थिती होती.

स्वर्गीय अजित पवार यांच्या विमान अपघातासारख्या गंभीर घटनेबाबत सत्य परिस्थिती समोर येण्यासाठी सक्षम तपास यंत्रणेमार्फत निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे आणि ती होत आहे. मात्र, कोणत्याही अधिकृत तपासाचा निष्कर्ष समोर येण्यापूर्वीच एखाद्या जबाबदार राजकीय व्यक्तीवर आरोप करणे म्हणजे संभ्रम निर्माण करणारे आहे. असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT