Soybean Crop Fire pudhari photo
नांदेड

Nanded Soybean Crop Fire : १०० क्विंटल सोयाबीन पेटविले; सात लाखांचे नुकसान

भोकर तालुक्यातील लामकानी येथील घटना; अज्ञाताविरुद्ध गुन्‍हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

भोकर : तालुक्यातील लामकानी येथे जमा करून ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या ढिगांना अज्ञात व्यक्तीकडून आग लावण्यात आल्याने यात अनेक शेतकऱ्यांचे अंदाजीत सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सदरील घटना २३ ऑक्टोबर रोजी पहाटे पावणेतीन वाजताच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात आले.

भोकर पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या लामकानी येथील रंजनाबाई माधव सूर्यवंशी, केशवराव गोविंदराव सूर्यवंशी,विठ्ठल गणेश सूर्यवंशी, अनुराधा बालाजी सूर्यवंशी, अनिता प्रकाश सूर्यवंशी यांच्या शेतातून सोयाबिन हे पीक काढून काही अंतरावर वेगवेगळे चार ढीग मारून ठेवले होते. निघालेल्या सोयाबीनचे शेतकरी एक ते दोन दिवसांत खळे करणार होते.

सोयाबीन ढिगांना आग लागल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतात जाऊन पाहणी केली असता सोयाबीन जळून खाक झाल्याचे दिसून आले. यात जवळपास शेतकऱ्यांचे सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत सांगण्यात आले.

सदरील सोयाबीनच्या ढिगाऱ्यांना अज्ञात व्यक्तींने पेटवून दिल्याची फिर्यादी शेतकऱ्यांनी दिल्यावरून भोकर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेचा पुढील तपास पोहेकाँ दीपक कंधारे हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT