Ashok Chavan: We will determine the direction of Mudkhed city's development
मुदखेड, पुढारी वृत्तसेवा मुदखेड शहराचा वेगाने विस्तार होत असूनही फक्त इमारती उभ्या राहणे हा विकास नाही. दर्जेदार पायाभूत सुविधा आणि नियोजन शिवाय शहराचा विकास साध्य करता येणार नाही, शहरात पाणीपुरवठा रस्ते आणि वाहतूक व्यवस्थापन आरोग्य शिक्षणाच्या सोयी सुविधांबरोबर स्वच्छता आणि सार्वजनिक सेवांचा दर्जा उंच ठेवत मुदखेड शहर स्वच्छ आणि विकसित गहावे या उद्देशाने पुढील काळात वाटचाल करीत विकासाची दिशा ठरविण्यात येईल, असे प्रतिपादन खा. अशोक चव्यण यांनी केले आहे.
नवनिर्वाचित नगराध्यक्षा विश्रांतीताई माधव कदम यांच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आ. अमिता चव्हाण, आ. अॅड. श्रीजया चव्हाण, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नरेंद्र चव्हाण, संचालक गोविंदराव पाटील शिंदे नागेलीकर, माजी उपनगराध्यक्ष माधव कदम, भाजपाचे तालुका अध्यक्ष दत्तू देशमुख वाडीकर, शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण, नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी जगदीश दळवी, नगरसेवक सुनील शेटे, शाम चंद्रे, संजय आऊलवार, प्रेमला पांचाळ, इम्रान मच्छीवाले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक माधव कदम यांनी केले. मुदखेड शहरवासीय व चव्हाण कुटुंबियांच्या विश्वासाला आगामी काळात कुठलाही तडा जाऊ दिला जाणार नाही. त्यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली शहराच्या सार्वजनिक विकासाचे नवे स्वान आगामी काळात साकार केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी प्रास्ताविकातून दिली. संजय कोलते यांनी सूत्रसंचालन केले. रामसिंग चव्हाण यांनी आभार मानले.
जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांच्या फोटोचा विसर
भाजपाचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांच्या फोटोचा वापर बॅनरमध्ये केला नसल्याने भाजपामध्ये सर्व काही ठिक नसल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. याची माहिती घेण्याकरिता अॅड. किशोर देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.
विकासासाठी अजूनही मोठी संधी
स्वच्छ, सुंदर आणि विकसित मुदखेडसाठी सातत्याने प्रयत्न केले जातील. आरोग्य, सिंचन, शिक्षण, रस्ते आणि उडाणपूल बांसारख्या क्षेत्रांत मोठचा प्रमाणात काम झाले असून, अजूनही विकासासाठी मोठी संधी आहे. पुढील काळात शहराचा सर्वांगीण विकास आपल्या सर्वाच्या सहकायनि केला जाईल, असे मत आ. अॅड. श्रीजया चव्हाण यांनी व्यक्त केले.