विशेष प्रतिनिधी
नांदेड : नांदेडसह महाराष्ट्रातील काही 'राजकन्या' आणि इतरांना वेगवेगळे पुरस्कार देण्याच्या समारंभास उपस्थित राहण्यासाठी संडनवारी करून आल्यानंतर पालकमंत्री अतुल सावे आणि खा. अशोक चव्हाण यांनी तब्बल आठवडाभराने रविवारी मुखेड तालुक्यातील पूरग्रस्त गावांमध्ये फेरी मारली. या दरम्यान त्यांना लोकांचा संताप, राग आणि तक्रारीशी सामना करावा लागला.
मुखेड आणि किनवट तालुक्यांच्या काही भागातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीदरम्यान जिल्ह्यातील नेतृत्वहीनता ठळक झाली होती. त्यावर वेगवेगळ्या माध्यमांमध्ये चौफेर टीका झाल्यानंतर ज्येष्ठ नेते, खा. अशोक चव्हाण दीर्घ कालावधीनंतर नांदेडमध्ये दाखल झाले. पालकमंत्री अतुल सापे यांच्याप्सोवत त्यांनी मुखेडमधील वाधित गावांना भेट देऊन पाहणी केली.
मागील रविवार-सोमबार दरम्यानच्या अतिवृष्टीमुळे मुखेड तालुक्यात लेंडी नदीकाठच्या रावणमाच-हसनाळ आणि इतर काही गावांना पुराचा तडाखा बसला. त्यानंतर चार-पाच दिवस प्रग्रस्तांचा आक्रोश बघायला मिळाला. या भागाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्र्यांस आठ दिवसानंतर सवड मिळाल्याच्या मुद्यावरून पूयस्त भागात लोकांनी आपला राग व्यक्त केला.
मंत्री साचे रविवारी सकाळी आधी नदिडमध्ये दाखल झाले. पूलग्रस्त भागाच्या पाहणीसाठी जाण्यापूर्वी त्यांनी अशोक चव्हाण आणि डॉ. अजित गोपछडे या खासदारद्रयांच्या उपस्थितीत एवंांदर परिस्थिती तसेच मदतकार्याचा आढावा घेतला. नंतर हे नेते इसनाळ गावी मोठ्या पोलीस बंदोबस्तात पोहचले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अविनाशकुमार व अन्य अधिकारी तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख या दौन्यात सहभागी झाले होते. पूर परिस्थिती उद्भवल्यापासून त्या भागातील शेकडो बाधित आणि कार्यकत्यांनी लेडी धरणाचे कार्यकारी अभियंता विवेकानंद तिडके यांच्यावरचा संताप सतत व्यक्त केला, मुख्यमंत्र्यांनी पाठविलेले मंत्री गिरीश महाजन यांव्याकडेही तिडकेची तक्रार करण्यात आली.
त्यांच्यामुळेच पुराचे संकट ओढवले, असे लेंडी वरण संघर्ष समितीचे म्हणणे आहे. पालकमंत्री सावे व अन्य नेत्यांसमोर रविवारी पुन्हा तिडकेविरोधी सूर निघाल्यानंतर त्यांच्यागर कारवाई करण्यात येईल, असे साये यांनी स्पष्ट केले. वरील विषय मागील आठ दिवसांपासून सुरू असला, तरी शासनाच्या जलसंपदा विभागाने तिडके यांना बदलले नाही. प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी तर तिडके यांची तरफदारी चालवली असल्याचे दिसून आले.
पाऊस व पुरामुळे हसनाळकरांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्या परिस्थितीत सत्ताधारी व विरोधी नेत्यांचे पूर पर्यटन सुरू आहे. याबाचत लोकांमध्ये तीव्र संताप असल्याचे सांगण्यात आले. पुढाऱ्यांचे हे दरि पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळणारे असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दोषींची तातडीने चौकशी करून संबंधितांना अटक करावी, या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचा ग्रामस्थांचा समज झाला आहे.
'नांदेड जिल्ह्यावरील पुराच्या संकटाच्या काळात मी एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमानिमित्त परदेशात होतो; पण जिल्ह्यातील गंभीर परिस्थितीकडे माझे लक्ष होते. जिल्हाधिकाऱ्यांशी माझा संपर्क होता. तेथून परतल्यावर मी लगेचच बाधित गावांना भेट देण्यासाठी, लोकांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आलो आहे.अतुल सावे, पालकमंत्री